‘या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 7 टक्क्यांनी वाढ, पगारातही होणार बंपर वाढ

‘या’ कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 7 टक्क्यांनी वाढ, पगारातही होणार बंपर वाढ

पुढारी ऑनलाईन: केंद्र सरकारने ६वा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ जाहीर केली आहे. हे असे कर्मचारी आहेत जे सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेस म्हणजेच CPSE मध्ये काम करतात आणि त्यांचे वेतन केंद्रीय महागाई भत्ता (CDA पॅटर्न) नुसार केले जाते. त्याचबरोबर 5 वा वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 12% वाढ करण्यात आली आहे.

अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांच्या मते, कर्मचार्‍यांना 1 जुलै 2021 पासून आतापर्यंत देण्यात येत असलेला महागाई भत्ता 189% इतका आहे. आता तो 189% वरून 196% एवढा होणार आहे. हे दर सीडीए कर्मचार्‍यांच्या बाबतीत लागू आहेत ज्यांचे वेतन डीपीई (सार्वजनिक उपक्रम विभाग) कार्यालयाच्या मेमोरँडमनुसार बदलले गेले आहे. महागाई भत्त्याची रक्कम राउंड फिगरमध्ये घेतली जाईल. भारत सरकारच्या विभागांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निदर्शनास आणून द्यावे.

महागाई भत्ता १२ टक्क्यांनी वाढला

केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता 356% वरून 368% पर्यंत वाढवण्यात आला आहे. हे असे कर्मचारी आहेत जे 5 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार पूर्व-सुधारित वेतनश्रेणी/ग्रेड वेतनामध्ये आपला पगार घेत आहेत.

5वा वेतन आयोग असलेल्यांना लाभ

महागाई भत्ता एक्स्पर्ट हरिशंकर तिवारी म्हणाले की, या वाढीचा लाभ 5 व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणा-या कर्मचा-यांना दिला जाईल, ज्यांनी मूळ वेतनात 50% डीए विलीन करण्याचा लाभ घेतला नाही. या CPSE कर्मचार्‍यांना देय असलेला डीए सध्याच्या 406% वरून 418% टक्के करण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2021 पासून लागू होण्याची शक्यता आहे. हरिशंकर तिवारी यांच्या मते, केंद्र सरकारच्या अखत्यारीत अशा अनेक सीपीएसई आहेत, जिथे वेतनश्रेणी वेगळी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news