Datta Jayanti 2023 : संजीवनगिरी आडी : दत्तगुरूंचे पावनस्थान

Datta Jayanti 2023 : संजीवनगिरी आडी : दत्तगुरूंचे पावनस्थान
Published on
Updated on

-मधुकर पाटील

सण आणि उत्सवांचे मानवी जीवनामध्ये एक वेगळेच महत्त्व आहे. त्यात जेवढा उत्साह असतो, तेवढीच वेदना दुःख विसरण्याची प्रक्रियाही असते. ईश्वरचिंतनातून मन:शांती प्राप्त करणे, आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणे आणि जीवन समृद्ध करण्याचोव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुमारे ३३ वर्षांपासून दत्त देवस्थान मठ-आडी येथे दत्त जयंती सोहळा (Datta Jayanti 2023) परमात्मराज ऊर्फ राजीवजी महाराज व त्यांच्या प्रेरणेने चालू आहे. हा जयंती सोहळा म्हणजे एक सर्व जाती-धर्माच्या लोकांचा एक लोकोत्सव बनला आहे. २६ रोजी सायंकाळी ५.०२ मिनिटांनी मंदिरात दत्त जन्मोत्सव (Datta Jayanti 2023) साजरा होणार आहे. त्यानिमित्त…

संबंधित बातम्या : 

परमात्मराज महाराजांनी मंदिराचा केलेला कायापालट पाहून या भागातील लोकांचे पाय आपोआप मंदिराकडे वळू लागले आहेत. डोंगराच्या दरीमध्ये मंदिराचा केलेला कायापालट हा वास्तुशास्त्राचा एक नमुनाच आहे. मंदिराच्या पायथ्याशी बांधलेले सर्वज्य सांस्कृतिक भवन आणि मंदिरासाठी बांधलेला मार्ग म्हणजे एक वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पादुका. प्रत्येक मंदिरात फक्त पादुका दिसतात. पण, या पादुका वेदिकामध्ये आहेत. या पादुका पाषाणांमध्ये महादेवाच्या पिंडीमध्ये आहेत. महादेवाच्या पिंडीमध्ये लिंग असतेच. पण, या पिंडीमध्ये फक्त पादुकाच आहेत. अशाप्रकारच्या पादुका क्वचितच ठिकाणी पाहावयास मिळतात. (Datta Jayanti 2023)

प्रत्येक पौर्णिमेला महाराजांचे मंत्रमुग्ध करणारे प्रवचन होते. दत्त मंदिरमध्ये अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. येथे फक्त अध्यात्मिक व धार्मिक मार्गदर्शन आणि परमेश्वराचे नामस्मरण केले जाते.

परमात्मराज महाराजांनी परमाब्धि ग्रंथाची रचना करून वैश्विक धर्माची संस्थापना केली आहे. त्यामुळेच आडी एक दत्त मंदिर आणि एक विश्व धर्म प्रसाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागरच आहे. हा ग्रंथ वाचून लोकांचे समाजाचे भले व्हावे, या उद्देशाने याचा लोकोत्सव दत्त जयंतीनिमित्त ७ दिवस केला जातो. याठिकाणी प्रसाद वल्लभालय बांधून भाविकांची सोय करण्यात आली आहे. समाजातील गोरगरीब लोकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी, या उद्देशाने वंदूर (ता. कागल) येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविक आणि दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने काम चालू आहे. परमात्मराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त देवस्थान मठ-आडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होतो. या दत्त जयंतीला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून लाखांवर भाविक येत असतात.

अनमोल ग्रंथसंपदा

परमात्मराज ऊर्फ राजीवजी महाराजांनी भाविकांना पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शन व्हावे, यासाठी अनमोल ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. यामध्ये 'परमाब्धि' (मूळ संस्कृत, मराठी भाषांतर), 'परमाब्धि' (मूळ संस्कृत, हिंदी भाषांतर), वर्तेट, रस्याव, सत्पोष, महोन्नय, चेयान (मराठी), चेयान (हिंदी), स्वानुभव (मराठी), स्वानुभव (हिंदी) या ग्रंथसंपदेचा समावेश आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news