राम मंदिराच्‍या तळमजल्‍यावरील १४ दरवाजांना सुवर्ण ‘झळाळी’!, जाणून घ्‍या अयोध्‍येत कशी सुरु आहे तयारी | पुढारी

राम मंदिराच्‍या तळमजल्‍यावरील १४ दरवाजांना सुवर्ण 'झळाळी'!, जाणून घ्‍या अयोध्‍येत कशी सुरु आहे तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात आहे.  २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. (Ayodhya Ram Temple) सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण पाठवले जात आहे. दरम्‍यान, राम मंदिरातील तळमजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजे महाराष्ट्रातील विदर्भातून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवले गेले आहेत. त्यावर तांब्याचा लेप करण्यात आला आहे. त्यांना सोन्याचा मुलामा देण्‍याची प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे.

राम मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजे हैदराबाद येथील कंपनीचे कन्याकुमारी, तामिळनाडू येथील कामगार तयार करत आहेत. या दरवाजांचे सौंदर्य आणि वैशिष्ट्ये म्हणजे, सोन्याने जडवलेले आणि सुंदर कोरीव डिझाइन असेल. आता दरवाजांचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे आहे. दिल्लीत या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्‍याची प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. या दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक गज (हत्ती), सुंदर विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. हे दरवाजे एकमेकांपासून भिन्न डिझाइनचे असून त्यांची रचना एलएनटी कंपनीने केली आहे.

गर्भगृहाच्या दरवाजाची उंची 8 फूट असून दरवाजाची रुंदी 12 फूट आहे. इतर दारवाजांची उंची केवळ 8 फूट आहे, दरवाजाची रुंदी एकमेकांपेक्षा वेगळी आहे जी 12 फूटांपेक्षा कमी आहे. जर गरज असेल तर दरवाजा अर्धा बंद किंवा पूर्णपणे उघडला जाऊ शकतो.

Ayodhya Ram Temple : नागर शैलीतील मंदिर

अयोध्‍येतील राम मंदिर मंदिर उत्तर भारतातील नागर शैलीवर बांधले जात आहे. ही शैली उत्तर भारतीय हिंदू वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे. वास्तुशास्त्रानुसार, नागर शैलीतील मंदिरांची ओळख म्हणजे पायथ्यापासून वरच्या भागापर्यंतचे चौकोनी स्वरूपाची आहे. या शैलीतील मंदिरांमध्ये लोखंड आणि सिमेंटचा वापर केला जात नाही. भुवनेश्वरमध्ये असलेले लिंगराज मंदिर हे नागर शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button