Darren Bravo : डॅरेन ब्राव्होचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय

Darren Bravo : डॅरेन ब्राव्होचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय

पोर्ट ऑफ स्पेन; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला त्याच्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. याबाबत क्रिकेट वेस्ट इंडिज वन-डे मालिका संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या Darren Bravo)

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून ब्राव्होकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जात होते, त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आणि याकडे त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती म्हणूनही पाहिले जात आहे. (Darren Bravo)

डॅरेन ब्राव्होने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, क्रिकेटपटू म्हणून पुढे जाण्यासाठी माझे पुढचे पाऊल काय आहे, याचा विचार करण्यासाठी मी थोडा वेळ घेतला आहे आणि मी विचार केला आहे की, एक क्रिकेटर म्हणून पुढे जाणे ही मोठी पैज आहे. पुढची पायरी काय आहे. यावेळी माझ्यासाठी समान ऊर्जा, जोश, बांधिलकी आणि शिस्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे नाही.

सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, हे सुमारे 40-45 खेळाडू आहेत. धावा करूनही मी कोणत्याही संघाचा भाग नाही. मी हार मानली नाही, मी फक्त त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

डॅरेन ब्राव्होने 2022 मध्ये अहमदाबादच्या मैदानावर भारताविरुद्ध एकदिवसीय सामना म्हणून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात तो केवळ 19 धावा करून बाद झाला.

ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी 56 कसोटीत 3538 धावा, 122 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3109 धावा आणि 26 टी-20 सामन्यात 405 धावा केल्या आहेत. ब्राव्होच्या नावावर कसोटी फॉर्मेटमध्ये 8 आणि वन-डेमध्ये 4 शतके आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news