देव तारी त्याला कोण मारी; ५ तास मलब्याखाली अडकूनही ती सुखरूप

देव तारी त्याला कोण मारी; ५ तास मलब्याखाली अडकूनही ती सुखरूप
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पूर्वेकडील जुन्या आयरे रोडला असलेली आदिनारायण भुवन ही तळ + 3 मजली धोकादायक इमारत शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीमधील बहुतांश रहिवासी बाहेर काढण्यात यशस्वी झाले. मात्र तीन जण मलब्यात अडकले होते. यातील दीप्ती लोढाया (54) ही महिला 5 तास अडकून सुद्धा जिवंत असून तिला बाहेर काढून दवाखान्यात हलवले. तर एका पुरुष व्यक्तीला बाहेर काढले. दुसऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे काम रात्री सुरू चालू होते. अरविंद भाटकर (70), सुनील लोढाया (70) गीता लोढाया (54) अशी या तिघांची नावे आहेत.  या दुर्घटनेत दीप्ती लोढाया (54) ही महिला बचावली, तर सुनील लोढाया (58) आणि अरविंद भाटकर (70) यांना मृत घोषित करण्यात आले.

इमारत धोकादायक झाली होती. त्यातच या इमारतीला क्रॅक गेल्याने केडीएमसी प्रशासनाने ही इमारत खाली करण्याच्या सूचना रहिवाशांना दिल्या होत्या. सकाळी केडीएमसीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. दुपारी रहिवासी आपले सामान घरातून बाहेर काढत असतानाच अचानक इमारतीचा वरील भाग कोसळू लागल्याने सर्वजण बाहेर पळाले. यात अरविंद हे मात्र इमारतीत अडकले होते. आजारी असल्याने ते अंथरुणाला खिळून होते. त्यांचा मुलगा सिद्धेश व आई हे दोघेही बाहेर पडले. पण अरविंद आतच अडकले. तर गीता आणि सुनील लोढाया यांना बाहेर काढण्यात प्रशासन यश आले. गीता या 5 तास अडकून सुद्धा जिवंत राहिल्या.

दरम्यान घटनास्थळी मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, स्थानिक माजी नगरसेवक नितीन पाटील, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, केडीएमसी प्रशासन, पोलिस प्रशासन, फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि कर्मचारी, टीडीराएफ टीम आणि सिव्हिल डिफेन्स उपस्थित होते.

या दुर्घटनेनंतर मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी बोलताना सांगितले की, संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसरात हिच परिस्थिती आहे. या परिसरातील गावे विकसित झाली आहे. त्यामुळे यांना क्लस्टर व्यतिरिक्त अन्य योजना आणून त्यांची पॉलिसी बनवणे जरूरीचे आहे. जशी उल्हासनगर पॉलिसी बनवली आहे, अशी काहीतरी पॉलिसी आणून घरमालकांसह रहिवाशांना फायदा कसा होईल आणि इथल्या रहिवाशांना घरे कशी मिळतील, याची एक पॉलिसी करणे गरजेचे आहे. आपल्याकडे पहिली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ठाण्यातील किसननगरसाठी घोषित झाली. अजूनही त्यांचे काही होत नाही.

लोकांचा याबाबतीत संभ्रम आहे. क्लस्टर योजना इथेही आणली तर ती चालणार आहे का ? क्लस्टरला पर्याय म्हणून प्रायव्हेट बिल्डर इथे येऊन कसा डेव्हलप करून ? त्यांना कशा सुविधा देता येतील ? याचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे विचार करून एखादी योजना आणावी लागेल. आम्ही देखील त्यासाठी पाठपुरावा करू. शासनाने त्यांना मदत करावी. दुर्घटनेतील जखमींना देखील शासनाने मदत करावी, अशीही मागणी आमदार पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

या संदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, या ठिकाणी धोकादायक इमारत खचल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत धोकादायक झाल्याने केडीएमसी प्रशासनाच्यावतीने त्यांना नोटीस देण्यात आली होती. तसेच सकाळपासून पालिका अधिकारी व कर्मचारी या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम करत होते. दुर्दैवाने या दुर्घेनेत जिवीतहानी झाल्याचे दुःख शहरप्रमुख मोरे यांनी व्यक्त केले.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news