Weather Forecast | मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस; राज्यातील ‘या’ भागांत यलो अलर्ट

Weather Forecast | मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस; राज्यातील ‘या’ भागांत यलो अलर्ट
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केरळनंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. काल (रविवार) मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस पडला. आता येत्या ३-४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे. (Weather Forecast)

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला आज (सोमवार) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींचाच अंदाज आहे.

यावर्षी महाराष्ट्रात मान्सून 4 ते 5 दिवस उशिरानं दाखल झाला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Forecast)

बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही

बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसून हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकले आहे. मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ६०० किलोमीटर दूरवरून हे वादळ पुढे सरकले. दोन दिवस शहराच्या किनारपट्टीला जोरदार वारे सुटले होते. मात्र यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news