Cyclone ‘Biparjoy’: ‘बिपरजॉय’चा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज; NDRF, RPF सह ‘या’ टीम तैनात

Cyclone 'Biparjoy'
Cyclone 'Biparjoy'
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'बिपरजॉय' चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. दरम्यान ते अतिशय तीव्र रूप धारण करत आहे. हे वादळ आज (दि.१५ जून) सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवरील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान या भागात १२५-१३५ ते १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. (Cyclone 'Biparjoy') या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि गुजरात प्रशासन सज्ज झाले आहे.

बिपरजॉय जसे पुढे सरकत आहे, तसे अतिशय तीव्र रूप धारण करत आहे. दरम्यान आज सायंकाळी हे वादळ कच्छमधील जखाऊ बंदरात धडकणार असून, या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल सज्ज झाले आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी ६ एनडीआरएफ, ३ आरपीएफ टीम, २ एसडीआरएफ टीम आणि ८ सेनेच्या टीम तैनात करण्यात आले, असल्याची माहिती गुजरातचे (Cyclone 'Biparjoy') जिल्हाधिकारी अमित अरोरा यांनी दिली आहे.

गुजरात किनापरपट्टीतील ४६ हजार लोकांचे निवारागृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच २० हजारांहून अधिक जनावरांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. सर्व निवारागृहांमध्ये पुरेशा प्रमाणात अन्न शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच फिल्डवर (Cyclone 'Biparjoy') ५० हून अधिक पथके तैनात, असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Cyclone 'Biparjoy': बंदरावरील व्यवहार बंद ठेवावेत- डॉ मृत्युंजय महोपात्रा

बिपरजॉय' चक्रीवादळामुळे ईशान्य अरबी समुद्रात आज समुद्राची स्थिती विस्कळीत राहणार आहे. दरम्यान किनारपट्टीवरील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, मासेमारी देखील स्थगित करावी. दरम्यान बंदरावरील आणि औद्योगिक व्यवहार तसेच तेल उत्खनन बंद ठेवण्यात यावेत, असे देखील IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महोपात्रा यांनी बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे.

गुजरातच्या किनारपट्टीवरील खमुद्र खवळला, वाऱ्याचा वेग वाढला

बिपरजॉय हे आज सायंकाळपर्यंत गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान किनारपट्टीच्या भागातील समुद्र खवळलेला दिसत असून, मोठ्या प्रमाणात लाटांची निर्मिती होत आहे. दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ तसेच जखाऊ बंदराच्या किनारपट्टीवरील भागाला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.  गुजरातमधील देवभूमी द्वारका शहराच्या किनारीपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे द्वारकामध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता देखील आहे. तसेच मांडवी किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला दिसत असून परिसरात जोरदार वारे वाहताना दिसत आहेत.

'बिपरजॉय'चा परिणाम; मुंबईतील चौपाट्या काही वेळासाठी बंद

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील किनारपट्टीवर देखील जाणवत आहे. मुंबईचा समुद्र खवळला असून, गेटवे परिसरातील किनारपट्टीवर उंच लाटा निर्माण होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या लाटा आदळल्याने मुंबईच्या जुहू बीचवर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर लोकांच्या प्रवेशावर काही वेळासाठी बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news