पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अलिकडे लोक बाजारात जावून खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग करण्यात जास्त पसंती देत आहेत. तसेच पेमेंटसाठी ऑनलाईन मोडचा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI या विविध पर्यायांचा वापर केला जात आहे.
दरम्यान, सणाच्या निमित्ताने अनेक कंपन्या विविध ऑफर्स देत आहेत आणि याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बनावट कंपन्यांच्या बनावट उत्पादनांच्या जाहिराती दिल्या जात आहेत. ज्यामध्ये अत्यंत कमी किंमतीत उत्पादने विकण्याचे आमिष दिले जाते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर अनोळखी लोकांपासून दूर राहावे
सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अनोळखी व्यक्ती सोशल मीडिया अकाऊंटवरून तुमच्याशी आधी मैत्री करतात. त्यानंतर काही भेटवस्तू पाठवण्याविषयी मेसेजेस करतात. यामध्ये मौल्यवान भेट वस्तू पाठवत आहोत. थोडे पैसे भरावे लागेल. त्यानंतर कस्टम ऑफिसर बनून फोन केला जातो आणि ते सांगतात की कस्टम ड्युटी भरा. मग तो तुम्हाला कस्टम ड्युटीच्या नावाने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला लावतात, परंतु असे करू नये.
पासवर्ड बदलत राहावे
सोशल मीडियांच्या खात्याचा किंवा बँक खात्यांचा पासवर्ड वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा लोक सर्व प्रकारच्या खात्यांसाठी एकच पासवर्ड ठेवतात. परंतु तसे टाळले पाहिजे. असे केल्याने ऑनलाइन फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पिन वेगळे ठेवावेत आणि काही दिवसांनी बदलत राहावे.
फ्री वायफाय, सायबर कॅफेचा वापर करू नये
अनेक वेळा लोक फ्री वाय-फाय वापरून ऑनलाईन व्यवहार केले जातात आणि ते टाळले पाहिजे. या काळात तुमचे बँकिंग तपशील हॅक होण्याची जास्त शक्यता असते. सार्वजनिक सायबर कॅफेमध्ये जाऊन बँकिंगचे कोणतेही काम करू नये.
UNSECURED साइट सुरू करू नये
इंटरनेट वापरून कोणतीही वेबसाइट उघडू नये जी असुरक्षित आहे. अशा साईट उघडून तुमची गोपनीय माहिती लीक होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय ब्राउझर अनेक वेळा अलर्टही देत असते त्याकडे दुर्लक्ष करू नये.
हेही वाचा