CSK vs DC : दिल्लीकडून चेन्नईचा 20 धावांनी पराभव

CSK vs DC : दिल्लीकडून चेन्नईचा 20 धावांनी पराभव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवत चेन्नईची विजयी घोडदौड थांबवली. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. चेन्नईच्या पराभवाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. तर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासह सातव्या स्थानावर आहे. (CSK vs DC)

दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकांत कर्णधार ऋतुराजच्या रूपात पहिला फलंदाज बाद झाला. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये असलेला रचिन रवींद्र अवघ्या दोन धावाकरून बाद झाला. यानंतर डॅरिल मिशेल आणि अजिंक्य रहाणे यांनी आश्वासक खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी रचली.

परंतु, डावाच्या 11 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने डॅरिल मिचेलला स्वताच्या चेंडूवर झेलबाद करत ही भागिदारी फोडली. यानंतर 13 व्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणे 45 धावांची खेळी करून बाद झाला. याच ओव्हरच्या पुढच्याच बॉलवर समीर रिझ्वीला बाद करत मुकेश कुमारने चेन्नईला बॅक फूटवर ढकलले. यानंतर 17 व्या ओव्हर शिवम दुबेच्या रूपात चेन्नईचा सहावा फलंदाज बाद झाला. (CSK vs DC)

यानंतर मैदानावर उतरलेल्या धोनीसोबत रवींद्र जडेजाने अंतिम षटकात फटकेबाजी करत सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. यामध्ये धोनीने कमबॅक करत 231 च्या स्ट्राईक रेटने 16 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकार ठोकत 36 धावांची खेळी केली तर, जडेजाने 17 बॉलमध्ये 2 चौकार लगावत 21 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 40 धावांचे लक्ष्य असताना धोनीने नॉर्टजेला चौकार आणि षटकार लगावून 20 धावा गोळा केल्या. अखेरच्या चेन्नईला सामन्यात 20 धावांनी पराभूत व्हावे लागले. गोलंदाजीमध्ये दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याच्यासह खलील अहमदने 2 तर अक्षर पटेलला 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 192 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. (CSK vs DC)

या सामन्यात पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. चेन्नईला पहिले यश मुस्तफिजुर रहमानने मिळवून दिले. त्याने10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरला पाथिरानाकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 52 धावा केल्या.

यादरम्यान त्याने बॅटमधून पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. पुढच्याच षटकात दिल्लीची दुसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने सेट फलंदाज पृथ्वी शॉला धोनीकरवी झेलबाद केले. या मोसमातील पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या शॉने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.

आयपीएलच्या 13व्या सामन्यात मथिशा पाथिरानाची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने ऋषभ पंत आणि मिचेल मार्श यांच्यातील 134 धावांची भागीदारी मोडली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली. मार्शला मथिशा पाथिरानाने ताशी 150 किमी वेगाने बॉलिंग केले. या स्टार अष्टपैलू खेळाडूने 12 चेंडूंचा सामना करत 18 धावा केल्या. याच्या पाथीरानाने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी संघाचा कर्णधार पंतही दमदार खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मैदानात परतल्यानंतर त्याने पहिले अर्धशतक झळकावले. या स्टार खेळाडूने 32 चेंडूत 51 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन षटकार आले. चेन्नईविरुद्ध अक्षर पटेल सात धावा करून नाबाद राहिला आणि अभिषेक पोरेल नऊ धावा करून नाबाद राहिला. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने तीन बळी घेतले. त्याने प्राणघातक गोलंदाजी केली. तर मुस्तफिजुर रहमान आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news