Crude Oil: रशियन क्रूड तेलाची आयात नव्या उच्चांकी स्तरावर

Crude Oil
Crude Oil

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: रशियाहून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची आयात नव्या उच्चांकी स्तरावर गेली आहे. सरत्या मे महिन्यात सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेहून आयात करण्यात आलेल्या एकत्रित क्रूड तेलापेक्षा (Crude Oil) जास्त आयात रशियाहून करण्यात आली असल्याची माहिती वोरटेक्सा संस्थेने आपल्या ताज्या अहवालात दिली आहे.

मे महिन्यात प्रती दिवस 1.96 दशलक्ष बॅरल इतकी कच्च्या तेलाची आयात रशियाहून करण्यात आली. एप्रिल महिन्याच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्याने जास्त होती. देशाला लागणाऱ्या क्रूड तेलापैकी (Crude Oil) 42 टक्के आयात रशियाहून केली जात आहे. एकाच देशातून इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली जाण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. सौदीहून केली जाणारी आयात 5 लाख 60 हजार टनांपर्यंत कमी झाली आहे. फेब्रुवारी 2021 पासूनचा हा सर्वात कमी आकडा आहे.

ओपेक देशांकडून केली जाणारी क्रूड तेलाची (Crude Oil) आयात देखील सर्वकालीन नीचांकी स्तरावर म्हणजे 39 टक्क्यांवर आली आहे. ओपेक संघटनेत प्रामुख्याने आखाती देश आणि आफ्रिकन तेल उत्पादक देशांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत ओपेक देशांकडून भारत तब्बल 90 टक्के इतकी क्रूड तेलाची आयात करीत होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. दुसरीकडे भारत, चीन यासारख्या मोठ्या देशांना बाजारभावापेक्षा कमी दरात क्रूड तेल देण्याचा निर्णय रशियाने घेतला होता. याचमुळे भारताने रशियन तेलाची आयात वाढविलेली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news