अमेरिकेनंतर युरोपमधील बँकिग क्षेत्र संकटात, जगातील सर्वांत मोठी Credit Suisse बँक दिवाळखोरीत?

अमेरिकेनंतर युरोपमधील बँकिग क्षेत्र संकटात, जगातील सर्वांत मोठी Credit Suisse बँक दिवाळखोरीत?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक बुडाल्यानंतर आता हे आर्थिक संकट आता युरोपमध्ये पोहोचले आहे. युरोपमधील सर्वांत मोठी बँक क्रेडिट सुइस (Credit Suisse) आता दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. स्विस बँक क्रेडिट सुइस ग्रुप एजीचे शेअर बुधवारी ट्रेडिंग दरम्यान २५ टक्क्यांहून अधिक घसरून निच्चांकी पातळीवर गेले. गेल्या ५ दिवसांत बँकेच्या शेअरमध्ये ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रेडिट सुइसने गुरुवारी सांगितले की ते स्विस सेंट्रल बँकेकडून ५४ अब्ज डॉलरपर्यंत कर्ज घेऊन आपली तरलता मजबूत करतील. कारण शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक ठेव संकटाची भीती तीव्र झाली आहे.

स्विस बँकेच्या अडचणींमुळ‍े आर्थिक संकट आता अमेरिकेतून युरोपमध्ये पोहोचले आहे. क्रेडिट सुइसच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराने नियामक अडचणींमुळे आणखी आर्थिक सहाय्य देऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर क्रेडिट सुईसने बँक शेअर्सची विक्री केली आहे. या बँकेच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या ३ महिन्यांत सुमारे एक तृतीयांश घट झाली आहे. बँकेच्या मोठ्या शेअरहोल्डरने आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. यामुळे बँकेच्या शेअर्सची जोरदार विक्री सुरु झाली आहे. स्वित्झर्लंड मुख्यालय असलेल्या Credit Suisse ची सर्वात मोठी शेअरहोल्डर सौदी नॅशनल बँक आहे. त्यांच्याकडे बँकेचे ९.९ टक्के शेअर आहेत.

क्रेडिट सुइसची गणना जगातील सर्वांत मोठ्या बँकेमध्ये

१६६ वर्षे जुन्या असलेल्या क्रेडिट सुइसची (Credit Suisse) गणना जगातील सर्वांत मोठ्या बँकेमध्ये केली जाते. ही UBS AG नंतरची स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वांत मोठी बँक आहे. जर का ही बँक दिवाळाखोरीत निघाली तर त्याचे व्यापक परिणाम युरोपवर होऊ शकतात. दरम्यान, क्रेडिट सुइस बँकेचे सीईओ उलरिच कोर्नर यांनी बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा केला आहे. बँक कधीही दिवाळखोरीत निघणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत २ बड्या बँका बुडाल्या

१० मार्च २०२३ रोजी अमेरिकेतील १६ वी सर्वांत मोठी सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली. पुढे २ दिवसांनी १२ मार्च रोजी अमेरिकेतील सिग्नेचर बँक बुडाल्याची बातमी आली. दोन्ही बँकांची उर्वरित संपत्ती अमेरिकन नियामकांनी आपल्या ताब्यात घेतली. एकटी सिलिकॉन बुडाल्याने जगभरातील गुंतवणूकदारांना ३८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. २१ भारतीय कंपन्यांनाही या घटनेचा फटका बसला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news