अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली!

America's Silicon Valley Bank
America's Silicon Valley Bank
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेत व्यापाच्या बाबतीत 16 वी सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेली सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे ठोकण्याचे आदेश कॅलिफोर्नियातील डीएफपीआय (डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन) या नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. बँकेची मूळ कंपनी असलेल्या एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे समभाग 9 मार्च रोजी जवळपास 60 टक्क्यांनी घसरल्यानंतर बँक बुडीत निघाली व हा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेवर याआधीही 2008 मध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले होते. त्यानंतर अमेरिकेच्या इतिहासातील आर्थिक पडझडीची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. एफडीआयसीने (फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) सिलिकॉन व्हॅली बँक ताब्यात घेतली असून, ग्राहकांचे पैसे सुरक्षित कसे राहातील, याची जबाबदारीही एफडीआयसीवर टाकण्यात आली आहे. एफडीआयसीने सारे काही ताळ्यावर आणण्यासाठी एक विशेष टीम स्थापन केली आहे. टीमच्या नियोजनानंतर सिलिकॉन बँक 13 मार्च रोजी उघडणार आहे. 13 मार्चनंतर सर्व ग्राहकांना त्यांच्या ठेवी काढण्याची मुभा असेल.

2022 अखेरीस या बँकेकडे 209 अब्ज डॉलरची मालमत्ता आणि 175.4 अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. यापैकी 89 टक्के रकमेला विमा संरक्षण नव्हते. एफडीआयसीने अद्याप याबाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. बँकेच्या अनेक सिक्युरिटीज तोट्यात विकल्याचा अहवाल एसबीव्ही या बँकेच्या मूळ कंपनीने दिला. ताळेबंदसाठी म्हणून 2.25 अब्ज डॉलरच्या नवीन शेअर्सच्या विक्रीची घोषणा केली. परिणामी अनेक भांडवली कंपन्यांना धडकी भरली आणि बँकेतून पैसे काढून घेण्याबाबत चढाओढ लागली.

गुरुवारी एसबीव्हीच्या समभागात घसरण झाल्यानंतर इतर बँकांच्या समभागांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळपर्यंत गुंतवणूकदार न सापडल्याने एसबीव्हीचे शेअर्स होल्डवर होते. फर्स्ट रिपब्लिक, पॅकवेस्ट बॅनकॉर्प आणि सिग्नेचर बँकसह इतर अनेक बँक स्टॉक्सही शुक्रवारी तात्पुरते ब्लॉक करण्यात आले. स्टार्ट-अप्स, टेक कंपन्या आणि उद्यम भांडवलात गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना आर्थिक सहायचे मुख्य उद्दिष्ट घेऊन 1983 मध्ये सिलिकॉन व्हॅली बँकेची स्थापना झाली होती.

बँक बुडण्याची 2 मुख्य कारणे

1) एसव्हीबीने वारेमाप बाँडस् खरेदी केले, त्यात मोठा तोटा झाला.
2) 2023 मध्ये अमेरिकन मध्यवर्ती बँकेने टेक कंपन्यांसाठी व्याजदरात वाढ केली.

अनुषंगिक परिणाम

1) व्याजदरात वाढ झाल्याने टेक कंपन्यांकडे फंडिंगचा ओघ कमी झाला
2) कंपन्या मग बँकेतून आपला सगळाच पैसा काढून घेऊ लागल्या.

9 मार्च 2023 : एसव्हीबी कंपनीने स्वत:ची 21 अब्ज डॉलरची संपत्ती
1.8 अब्ज डॉलर तोट्यात विकली.
100 अब्ज

डॉलरचा फटका

गेल्या 2 दिवसांत अमेरिकेतील बँकांचे शेअर बाजारात 100 अब्ज डॉलरचे नुकसान झाले
आहे. युरोपियन बँकांनाही 50 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.

भारतीय कंपन्यांनाही फटका?

सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्याने अनेक भारतीय स्टार्ट अप्सवरही विपरित परिणाम होणार आहे.
एसव्हीबी या बँकेच्या मूळ कंपनीने भारतातील सुमारे 21 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
एसएएएस-युनिकॉर्न आयसर्टिस या भारतीय कंपनी दीडशे दशलक्ष डॉलरची गुंतवणूक एसव्हीबीने केलेली आहे.
ब्ल्यूस्टोन, पेटीएम, वन 97 कम्युनिकेशन, पेटीएम मॉल, नापतोल, लॉयल्टी रिवॉर्डस्मध्येही एसव्हीबीची लक्षणीय गुंतवणूक आहे.

काय झाले होते 2008 मध्ये?

यापूर्वी 29 सप्टेंबर 2008 रोजी जेव्हा अमेरिकन बाजार खुला झाला तेव्हा घसरणीचे सारे उच्चांक मोडीत निघाले होते. समभागांतील
48 टक्के घसरणीसह लीमॅन ब्रदर्स कंपनी दिवाळखोर ठरल्याचा हा परिणाम होता. मंदीसाठी अमेरिकेची दारे या घटनेने सताड उघडी केली होती. अ‍ॅपलपासून ते जेपी मॉर्गनपर्यंत अमेरिकेतील सार्‍या बड्या कंपन्यांचे समभाग तेव्हा कोसळले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news