अभिनेत्री रश्मिका मंदानाच्‍या ‘डीपफेक’ व्हिडिओ प्रकरणातील सूत्रधारास अटक

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्‍या ‘डीपफेक’ व्हिडिओ प्रकरणातील सूत्रधारास अटक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणातील मुख्‍य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी १० नोव्‍हेंबर २०२३ रोजी गुन्‍हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपी सायबर गुन्ह्यांमध्ये सराईत आहे. ( Creator of deepfake video of actor Rashmika Mandanna arrested )

Rashmika Mandanna : रश्मिका ठरली हाेती 'डीपफेक' व्हिडिओची बळी

६ नोव्‍हेंबर रोजी रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्‍ये ती एका लिफ्टमध्ये दिसत होती. डीपफेक व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर रश्‍मिकाने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले होते की, "माझा डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल बोलताना मला खूप वाईट वाटते. AI केवळ माझ्यासाठीच नाही तर या तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे धोक्यात असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे." या प्रकरणी रश्मिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. आता मुख्य आरोपीला अटक करण्‍यात पोलिसांना यश आले आहे. (  Creator of deepfake video of actor Rashmika Mandanna arrested )

रश्मिका मंदानाच्‍या डीपफेक व्हिडिओ व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. ही मुलगी दुसरीच असली तरी. काही काळानंतर हे स्पष्ट झाले की हा व्‍हिडिओमधील तरुणी मंदाना नसून झारा पटेल आहे.

डीपफेक व्हिडिओ प्रकरणी सेलिब्रिटींसह अनेकांनी तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली होती. डीपफेक व्हिडिओंच्या धोक्याला सर्वाप प्रथम रश्मिका मंदाना बळी पडली. यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट, काजोल, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी सेलिब्रिटींनाही याचा फटका बसला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतीने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओने नवा धोका जाणवू लागला आहे.

माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा हाेणार

डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या गैरवापराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले होते की, सरकार अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्यावर विचार करत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news