Emergency landing: रेडबर्ड कंपनीच्या प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात; २ पायलट जखमी

Emergency landing: रेडबर्ड कंपनीच्या प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात; २ पायलट जखमी

पुढारी ऑनलाईन: रेडबर्ड एव्हिएशनच्या दोन सिटर्स प्रशिक्षण विमानाचा आज (दि.३०) कर्नाटकातील सांब्रा विमानतळाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला. उड्डाणावेळी विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने ईमर्जन्सी लँडिंग केले.  बेळगावी येथील सांब्रा विमानतळाजवळ रेडबर्ड एव्हिशन (Emergency landing) विमान तात्काळ खाली उतरवताना हा अपघात झाला. या अपघातात विमानातील दोन्ही पायलट किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती एएनआयने दिलेल्या वृत्तात दिली आहे.

रेडबर्ड एव्हिएशनच्या विमान उड्डाणावेळी तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात येताच, त्याचे इमर्जन्सी लँडिंग केले. पण या अपघातात दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हवाई (Emergency landing) दलाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे देखील एएनआयने वृत्तात सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news