नवीन संसदेत पोहोचताच ईशा गुप्ताने केली मोठी घोषणा; म्हणाली…

नवीन संसदेत पोहोचताच ईशा गुप्ताने केली मोठी घोषणा; म्हणाली…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशाला नवे संसद भवन हे १९ सप्टेंबर रोजी मिळाले. हा भारसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या या ऐतिहासिक क्षणाचा बॉलीवूड ही साक्षीदार झाला. कंगना रनौत आणि ईशा गुप्ता नवीन संसदेत पोहोचल्या. दोन्ही अभिनेत्रींना खास निमंत्रण मिळाले होते.

कंगना-ईशा नव्या संसदेत

कंगना रणौत आणि ईशा गुप्ता यांचा संसद भवनाबाहेरचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दोन्ही अभिनेत्रींनी यावेळी एथनिक लूक केला होता. कंगना पांढऱ्या रंगाच्या साडीत तर ईशा गुप्ता सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होत्‍या.

ईशाने निवडणूक लढवण्यासंदर्भात केले मोठे वक्तव्य

केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या सोमवारी झालेल्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. अभिनेत्री ईशा गुप्ता नवीन संसद भवनात पोहोचली. जिथे त्यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

अनेक शानदार बॉलिवूड चित्रपट आणि 'आश्रम 2' या वेब सीरिजमध्ये आपला हॉटनेस जोडणारी अभिनेत्री ईशा गुप्ता नुकतीच नवीन संसद भवनात पोहोचली. यावेळी ईशा गुप्ता यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीबाबत मोकळेपणाने बोलले. अभिनेत्री म्हणाली, "पीएम मोदींनी केलेले हे खूप सुंदर काम आहे. जे आपल्या देशासाठी एक मोठे पाऊल आहे.",असे ती म्‍हणाली.

महिला आरक्षण विधेयकावर कंगना म्हणाली..

कंगना महिला आरक्षण विधेयकावर बोलली. तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. महिलांसाठी राजकारणात करिअर करणे किती कठीण असते, हे कंगनाने सांगितले. कंगना म्हणाली की, नवीन संसदेचे पहिले अधिवेशन महिला सशक्तीकरणाला समर्पित करणे हा महिलांचा सन्मान आहे.

पुढे ती म्‍हणाली, पंतप्रधान मोदींनी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून खूप मोठे-मोठे निर्णय घेतले आहेत. आता आपण लष्कर आणि हवाई दल यांसारख्या लढाऊ क्षेत्रात ही महिलांना पाहत आहे.

कंगना राणौत स्‍पष्‍टपणे आपले मत मांडण्यासाठी ओळखली जाते. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करण्यास ती मागेपुढे पाहत नाही. तिने अनेकवेळा पीएम मोदींचे कौतुक केले आहे. कंगनाची राजकारणातील आवड पाहून तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबत संकेत बांधले जात आहे. परंतु सध्या तिचे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे. अभिनयासोबतच तिने दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटांमध्ये तेजस, चंद्रमुखी, इमर्जन्सी यांचा समावेश आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news