परभणी : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरूणांनी खुर्च्या फेकल्या, पोलिसांकडून लाठीमार

परभणी : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरूणांनी खुर्च्या फेकल्या, पोलिसांकडून लाठीमार
Published on
Updated on

परभणी; पुढारी वृत्तसेवा : परभणीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. येथील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी निमित्त गौतमी पाटीलच्या आयोजित कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातला. स्टेडियमवर खुर्च्यांची मोडतोड, फेकाफेकी व धक्काबुक्कीचे प्रकार झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, संयोजकांनी गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम थांबवत दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू ठेवली.

संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने स्टेडियम मैदानावर दहीहंडी स्पर्धेसाठी कलावंत गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी ४ वाजल्यापासूनच युवक मोठ्या संख्येने स्टेडियम मैदानावर दाखल झाले होते. संपूर्ण स्टेडियम गर्दीने खचाखच भरले होते. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता. सातच्या सुमारास गौतमी पाटीलचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर संयोजकांनी तिचे स्वागत केले. त्यानंतर काहीच वेळात तिने नृत्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठाच्या एका बाजूचा युवक वर्ग मोठ्या संख्येने गोंधळ घालत होता. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा गोंधळ वाढत जाऊन काही वेळातच खुर्च्यांची मोडतोड व फेकाफेकी करण्यास सुरुवात झाली. हे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीमार सुरू केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मोठी धावपळ सुरू झाली हे पाहून संयोजकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम थांबविला. पोलिसांनी तरुणांना स्टेडियम बाहेर काढले. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news