हिमाचलमध्ये पावसाचा कहर, मृतांची संख्‍या २९वर, ५०० मार्ग बंद

हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असू्न नद्यांना पूर आला आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असू्न नद्यांना पूर आला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. मृतांची संख्‍या २९ वर पोहचली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. नद्यांना पूर आला असून, पावसाचा जोर कायम राहिल्‍याने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. भूस्खलनामुळे सिमला-धर्मशालासह सुमारे ५०० रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. (Himachal Pradesh rainfall) दरम्‍यान, राज्‍यात १५ ऑगस्‍टपर्यंत अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आल्‍याने प्रशासन अर्लटवर आहे.

सोलन जिल्ह्यातील एका गावात ढगफुटीमुळे एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरा जडों गावात ही घटना घडली. दोन घरे वाहून गेली असून सहा जणांना वाचवण्यात यश आल्याचे सोलनचे विभागीय आयुक्त मनमोहन शर्मा यांनी सांगितले.

Himachal Pradesh rainfall :  मंदिरावर दरड कोसळली, ९ जणांचा मृत्‍यू

सिमला शहरातील समरहिल भागातील शिव मंदिरावर दरड कोसळून झालेल्‍या दुर्घटनेतील मृतांची संख्‍या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढीगार्‍याखाली ५० हून अधिक जण गाडले गेल्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. हिमाचल प्रदेशातील संततधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

मुख्‍यमंत्री सुखू यानी सर्व जिल्‍हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, गृह सचिव तसेच सर्व डीसींना दिल्या आहेत. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून रस्ते, वीज आणि पाण्याची सुरळीत व्यवस्था ठेवावी, असाही आदेश त्‍यांनी दिला आहे.

उत्तराखंडमधील सहा जिल्‍ह्यांमध्‍ये रेड अलर्ट जारी

उत्तराखंडमधील चमोलीत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून लोकांच्या घरापासून दुकानांपर्यंत पाणी आले आहे. उत्तराखंडमधील डेहराडून, टिहरी, पौरी, चंपावत, नैनिताल आणि उधम सिंह नगरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर हरिद्वारसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिद्वारमध्ये गंगा नदी धोक्याच्या चिन्हावरून एक मीटर वर वाहत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news