राजस्थानात जाट मतांचे प्रमाण ९ टक्के आहे. त्यामुळे, भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत ज्योती मिर्धा यांना नागोरमधून लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे. यासोबतच, भाजपलाही विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची हक्काची मतपेढी मानल्या जाणाऱ्या जाट मतदारांमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळणार आहे. कॉंग्रेसचे प्रमुख जाट नेता आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा हे मिर्धा कुटुंबाचे नातेवाईक आहेत.