Lok Sabha elections 2024 | ब्रेकिंग! लोकसभेसाठी AAP-Congress युतीचा फॉर्म्युला ठरला, ५ राज्यांतील जागावाटपाची घोषणा

Lok Sabha elections 2024 | ब्रेकिंग! लोकसभेसाठी AAP-Congress युतीचा फॉर्म्युला ठरला, ५ राज्यांतील जागावाटपाची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली, गुजरात, हरियाणा, चंदीगड आणि गोवा या पाच राज्यांतील जागावाटपाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिल्लीत लोकसभेच्या ७ जागा आहेत. यातील ४ जागा आप लढवेल. यात नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या जागांचा समावेश आहे. तर काँग्रेस चांदनी चौक, ईशान्य आणि उत्तर पश्चिम दिल्ली अशा ३ जागा लढवणार आहे." (Lok Sabha elections 2024)

गुजरातमधील २६ जागांपैकी काँग्रेस २४ आणि आप २ (भरूच आणि भावनगर) जागा लढणार आहे. हरियाणात ही युती १० जागा लढवणार आहे. यात काँग्रेस ९ आणि आप १ (कुरुक्षेत्र) जागेवर लढेल. चंदीगडमध्ये काँग्रेस केवळ एका जागेवर निवडणूक लढणार आहे. गोव्यात काँग्रेस दोन्ही जागांवर लढेल, असे मुकुल वासनिक यांनी सांगितले.

पंजाबमधील जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. येथे सत्ताधारी AAP ने पूर्वी सांगितले होते की ते तेथील सर्व १३ लोकसभा मतदारसंघात लढतील.

वासनिक पुढे म्हणाले की, आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार असले तरी ते एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवतील.

आपचे खासदार संदीप पाठक म्हणाले, "भाजप सरकार एकामागून एक सर्व संघटना संपवत आहे. निवडणुका 'चोरी' होत आहेत आणि निवडणुका जिंकण्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, ज्या पद्धतीने देशातील जनता बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहे. यासाठी देशाला एका प्रामाणिक आणि सशक्त पर्यायाची गरज आहे. हे लक्षात घेऊन, स्वतःचा राजकीय हेतू बाजूला ठेवून देशहितासाठी आम्ही या युतीत एकत्र आलो आहोत. देश महत्त्वाचा आहे. पक्ष नेहमीच दुय्यम असतो. ही निवडणूक काँग्रेस इथून लढेल, 'आप' तिथून लढेल अशा पद्धतीने लढवली जाणार नाही. INDIA आघाडी ही निवडणूक लढवेल…"

भरूच जागा 'आप'ला

गुजरातमधील भरूच लोकसभेची जागा काँग्रेसने 'आप'ला दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे, "भरूच लोकसभा जागा युतीमध्ये मिळवता न आल्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांची मनापासून माफी मागते. मी तुमची नाराजी समजू शकते. आम्ही काँग्रेसला अधिक मजबूत बनवण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ. अहमद पटेल यांचा ४५ वर्षांचा वारसा आम्ही वाया जाऊ देणार नाही."

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news