Lok Sabha Elections : भाजपची पहिली यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात? | पुढारी

Lok Sabha Elections : भाजपची पहिली यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आक्रमक तयारी करणारा भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांची नावे लवकर जाहीर करून विरोधकांवर दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. याअंतर्गत भाजपने मार्चच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळपत्रक जाहीर होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भाजपचा प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे. (Lok Sabha Election 2024)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या पहिल्या यादीत जवळपास 100 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या जागांवर भाजप प्रथम उमेदवार जाहीर करेल. या जागांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्रातील भाजपने न जिंकलेल्या जागांचा समावेश असेल. (Lok Sabha Election 2024)

Back to top button