पुढारी ऑनलाईन : घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केल्यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १५८ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर आता १,५२२.५० रुपयांवर आला आहे. हे दर आज १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. (Commercial LPG Prices)
यापूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून मोदी सरकारने घरगुती एलपीजीच्या किमतीत २०० रुपयांची कपात केली होती. याआधी ऑगस्टमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ९९.७५ रुपयांची कपात केली होती. जुलैमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
या वर्षी मे आणि जूनमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सलग दोनदा कपात करण्यात आली होती. मे महिन्यात व्यावसायिक एलपीजीची किंमत १७२ रुपयांनी कमी केली होती, तर जूनमध्ये ८३ रुपयांची कपात केली होती. एप्रिलमध्येही दर ९१.५० रुपयांनी कमी केला होता.
पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी या वर्षी १ मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३५०.५० रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ५० रुपये प्रति युनिटने वाढवली होती. (Commercial LPG Prices)
हे ही वाचा :