Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती आली समोर

Raju Srivastava
Raju Srivastava
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी (दि. १०ऑगस्ट) एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सच्या डॉक्टरांच्या निगरानीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवारी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीबद्दलच्या खोट्या बातम्या आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन त्यांनी निवेदनातून केले. (Raju Srivastav)

राजू यांच्या इंस्टाग्राम हँडलवर असे लिहिले आहे की, "प्रिय सर्व, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्व हितचिंतकांचे आभार. कृपया प्रसारित केल्या जाणार्‍या कोणत्याही अफवा/खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा." असे म्हणण्यात आले आहे. (Raju Srivastav)

या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांच्या तब्येतेबद्दल कमेंट केल्या आहेत. यामध्ये "राजू सर लवकर बरे व्हा." "तुमच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. जल्दी से एकदुम सही हो जाइये (जल्दी बरे व्हा)" राजूच्या बरे होण्यासाठी डॉक्टरांचे एका चाहत्याने आभार मानले आहेत. भारतातील सर्वोत्कृष्ट कॉमेडियनला जीवनदान दिल्याबद्दल देवाचे आभार." अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर होत आहेत.

बुधवारी राजूला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते कोसळले. त्यांना तातडीने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) नेण्यात आले. राजूने मैने प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवा आणि आमदानी अथन्नी खर्चा रुपैया यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्येही तो दिसला होता. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमध्ये स्टँड-अप कॉमेडियन म्हणून काम केल्यानंतर, तो त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंगसाठी प्रसिद्धीच्या झोतात आला. ते चित्रपट विकास परिषदेचे उत्तर प्रदेशचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news