निपाणी पालिका सभेत 7 विषयांना बहुमताने मंजुरी

निपाणी पालिका सभेत 7 विषयांना बहुमताने मंजुरी
Published on
Updated on

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा साडेसहा महिन्यांनंतर शुक्रवारी झाली. सभेत विषय पत्रिकेवरील 7 विषयांना सत्तारूढ गटाने बहुमताने मंजुरी दिली. विरोधी गट नेते विलास गाडीवड्डर यांनी, खासगी लेआउटमध्ये कामे करण्यास शासनाची मंजुरी नाही, जवाहरलाल तलाव भरला असताना शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणी का, 24 तास पाणी योजना 100 टक्के पूर्ण झाली आहे का, असे प्रश्‍न विचारले. यावरील चर्चेने सभागृहात थोडा गोंधळ झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले होते. सभेला मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची उपस्थिती होती.

खासदार जोल्ले यांनी, यापूर्वी काही व्यक्‍तींनी आरटीआयखाली खासगी लेआउट प्रश्‍नी ब्लॅकमेलिंग सुरू केले होते. कर भरणार्‍या व्यक्‍तींच्या वसाहतीमध्ये विकास झाला पाहिजे. विकास न करणार्‍या लेआउट मालकांना क्लिअरन्स देऊ नका, असे सांगितले. गाडीवड्डर यांनी, विकासकामे न झालेले प्लॉट रिलीज कसे केले, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली तसेच विद्यमान सभापतींच्या रोहिणीनगर लेआउटमध्ये विकासकामे का झाली नाहीत, असा सवाल केला.

दत्ता जोत्रे यांनी बगाडे प्लॉट व गायत्रीनगर मध्ये विकासकामे कोणी केली, असा सवाल केला. अनिता पठाडे यांनी देवपूजेला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी पाच कोटी 88 लाखांवर पाणी बिल थकबाकी असल्याने 217 नागरिकांना लोकअदालतमधून नोटीस दिली असल्याचे सांगितले. शौकत मनेर यांनी पाणीपट्टी दहा हजार रुपये येत असल्याचा आरोप केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा व्हायला हवी अशी भूमिका जसराज गिरे, शेरू बडेघर, दत्ता नाईक यांनी मांडली. विरोधी गटाने जानेवारी ते जुलै महिन्याच्या जमाखर्चाला विरोध दर्शविला. सभेत पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानातून करायची कामे एसएफसी, एससीपी, इएसपी योजनेतून करायची कामे तसेच नगराध्यक्षांनी मंजूर केलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यानात आयएल – 38 एअरक्राफ्ट बसवण्याबाबत मंजुरी देण्यात आली.

संतोष सांगावकर यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या निवडीबद्दल तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवलेल्या खेळाडूंचा व बसव प्रसाद जोल्‍ले यांना विकासरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडला. दत्ता जोत्रे यांनी सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या व्यक्तीचा निषेध नोंदवला.

सभेला उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक सद्दाम नगरजी, संतोष सांगावकर, संतोष माने, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी , कावेरी मिरजे, दीपाली गिरी, रंजना इंगवले, अरुणा मूदकुडे, आशा टवळे, उपासना गारवे, उदय नाईक, दीपक पाटील, सोनाली उपाध्ये, सोनल कोठडीया, बाळासाहेब देसाई सरकार, संजय पावले, शांती सावंत आदींची उपस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news