Cold Weather Impact: उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय

Cold Weather Impact: उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरेकडील बहुतांशी राज्यात थंडीची लाट आहे. पुढील काही दिवसात येथील थंडी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीपाठोपाठ पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. (Cold Weather Impact)

उत्तरेतील वाढत्या थंडीमुळे पंजाबमधील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा आजपासून (दि.८) रविवारपर्यंत  (दि.२४) इयत्ता १० वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय भगवंत मान सरकारने घेतला आहे. या संदर्भातील माहिती पंजाब सरकारने त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत X अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. (Cold Weather Impact)

दिल्लीतील प्राथमिक शाळांना पुढील चार दिवस सुट्टी

उत्तरेकडील अनेक राज्यात तापमानाचाा पारा घसरला आहे. दरम्यान, थंडीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. काही राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाकडून पुढील ४ दिवस नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या शांळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, सध्याच्या थंड हवामानामुळे दिल्लीतील नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत आहेत. शहरातील शाळा शुक्रवार १२ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे देखील आतिशी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. (Delhi Weather News)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news