ऑस्कर पुरस्कार 2022 : ट्रॉय कोत्सुर ठरले ऑस्कर मिळवणारे पहिले कर्णबधिर अभिनेते

TroyKotsur
TroyKotsur

पुढारी ऑनलाईन डेस्क :

"मी करून दाखवलं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे", अशा शब्‍दात ऑस्‍कर पुरस्‍कारात सहाय्यक अभिनेता पुरस्‍कारावर आपलं नाव काेरणार्‍या ट्रॉय कोत्सुर यांनी आपल्‍या भावनांना वाट करुन दिले. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ते पहिले अभिनेते ठरले आहेत.

कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस येथे ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये सर्वोत्कृष्ट कोडा (CODA) या चित्रपटातील सहाय्यक अभिनेता ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur) याने ऑस्कर पुरस्कार जिंकत इतिहास रचला . ३५ वर्षांपूर्वी मार्ली मॅटलिनने 'चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड' (1986) यासाठी मुख्य अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला होता. ऑस्कर जिंकणारी ती पहिली मूकबधिर अभिनेत्री होती.

सहाय्यक अभिनेता ट्रॉय कोत्सुर (TroyKotsur) यांनी हा पुरस्कार कर्णबधिर, अपंग आणि 'कोडा' समाजाला समर्पित केला आहे. अमेरिकन सांकेतिक भाषेद्वारे (एएसएल) केलेल्या आपल्या भाषणात भावनिक होत कोत्सूर म्हणाले, "या ठिकाणी असणे खरच आश्चर्यकारक आहे. मी येथे उभा आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल अकादमीचे आभार". 'कोडा' हा चित्रपट जगभर पाहिला गेल्याने मला खूप आनंद होत असल्याचेही त्‍यांनी नमूद केले.  सांगितले.

कोडा' (CODA) दिग्दर्शक शॉन हेडर यांनी कर्णबधिर आणि श्रवणदोषांचे जग एकत्र आणले आहे. यादरम्यान पाठिंबा दिल्याबद्दल त्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे आभारही मानले. कुटुंबाविषयी बोलताना तो म्हणाला, "माझे सर्व चाहते, माझी पत्नी आणि माझी मुलगी कायरा यांचा मी आभारी आहे. माझा व्यवस्थापक मार्क फिनले आणि आमची टीम,  आई, बाबा आणि भाऊ मार्क हा आमचा सर्वांचा क्षण आहे. मी करून दाखवलं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असे म्हणत त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले.

सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार चित्रपट : 'कोडा'  (CODA)

'कोडा' ' (CODA) म्हणजेच 'चाइल्ड ऑफ डेफ अॅडल्ट्स' हा चित्रपट एका कर्णबधिर कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा आहे. हा २०१४ मध्ये आलेल्या फ्रेंच फीचर फिल्म 'ला फॅमिली बेलियर' या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट इतर हॉलीवूड चित्रपटांप्रमाणेच प्रेम, नाटक आणि विनोद दाखवत आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news