Stock Market Closing Bell | शेअर बाजारात ब्लडबाथ! सेन्सेक्स ८२५ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांना ७.५६ लाख कोटींचा फटका

Stock Market Crash
Stock Market Crash

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य पूर्वेतील इस्रायल- हमास संघर्षाचे पडसाद भारतीय शेअर बाजारात कायम आहेत. आजही सोमवारी (दि.२३) शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रांत घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ८५० अंकांहून अधिक घसरून ६४,५५० पर्यंत खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ८२५ अंकांच्या घसरणीसह ६४,५७१ वर बंद झाला. तर निफ्टी २६० अंकांच्या घसरणीसह १९,२८१ वर बंद झाला. सेन्सेक्सवर एम अँड एम वगळता सर्व शेअर्स घसरले. आज बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. आज सेन्सेक्सची घसरण १.२६ टक्क्यांनी तर निफ्टी १.३४ टक्क्यांनी खाली आला.

आजच्या या घसरणीमुळे बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.५६ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३११.३३ लाख कोटी रुपयांवर आल्याचे द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स, विप्रो,, एचसीएल टेक हे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले. एनटीपीसी, एसबीआय, एलटी, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, कोटक बँक, पॉवर ग्रिड, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, मारुती, टायटन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स हे १ ते २ टक्क्यांदरम्यान घसरले.

आज सर्वाधिक विक्रीचा मारा आयटी क्षेत्राने अनुभवला. याआधी शुक्रवारी  (दि. २०) भारतीय बाजार सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स २३१ अंकांनी घसरून ६५,३९७ वर बंद झाला होता.

कमकुवत जागतिक संकेत

यूएस ट्रेझरी उत्पन्न ५ टक्क्यांच्या वर गेल्याचाही फटका आज सोमवारी भारतीय शेअर बाजाराला बसला. मध्य पूर्वेतील तीव्र संघर्षाच्या उच्च जोखमींमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे संपूर्ण आशिया आणि युरोपमधील बाजारातील घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस २ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे १० वर्षीय रोखे उत्पन्नदेखील १६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. याचे पडसाद बाजारात उमटत आहेत.

आयटी शेअर्सच्‍या विक्रीने बाजाराचा मूड बदलला

आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी शेअर बाजाराने घसरण कायम राहिली. सुरुवातीच्‍या व्‍यवहारात बीएसई सेन्सेक्स २०० अंकांच्या घसरणीसह ६५,२०० च्या खाली घसरला. तर निफ्टीही ८० अंकांनी घसरून १९,५०० वर राहिला. ऑटो, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि रियल्टी लाल चिन्हात खुले झाले होते, तर फायनान्शियल सर्व्हिसेस, मीडिया, मेटल, पीएसयू बँक, खासगी बँक सोमवारी सकारात्मक क्षेत्रात उघडले. निफ्टीमध्ये, कोटक बँकेचा शेअर २ टक्क्यांच्या घसरणीसह खाली आला होता. तर ICICI बँकेचा शेअर टॉप गेनर होता. बाजारात सर्वाधिक विक्री आयटी क्षेत्रात झाली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news