तळेगाव ढमढेरे येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

तळेगाव ढमढेरे येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  येथे शेतजमिनीच्या वादातून भावकीतील दोन गटांत बेदम हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 28) घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे रघुनाथ भुजबळ व भरत भुजबळ यांची शेजारी-शेजारी शेतजमीन असून, त्यांच्यात शेतजमिनीबाबत यापूर्वी रस्ता व बांधाच्या कारणातून वाद झालेले आहेत. शनिवारी दोन्ही गटांत जमिनीच्या कारणातून वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

संबंधित बातम्या :

दरम्यान, दोन्ही गटांत लाकडी दांडके व फावड्याने हाणामारी होऊन काही जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत प्रतीक्षा भरत भुजबळ (वय 22, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) व रघुनाथ भिकोबा भुजबळ (वय 70, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी भरत चंदर भुजबळ, शत्रुघ्न चंदर भुजबळ, सिंधूबाई चंदर भुजबळ आणि आप्पा चंदर भुजबळ (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) तसेच रोहिदास रघुनाथ भुजबळ आणि रघुनाथ भिकोबा भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news