Manoj Jarange-Patil : फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार: मनोज जरांगे-पाटील | पुढारी

Manoj Jarange-Patil : फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार: मनोज जरांगे-पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : मला समाजापेक्षा कुणीही मोठं नाही, फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे, सरसकट मराठ्यांना दाखले द्यावेत, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.३०) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलून दाखविला. Manoj Jarange-Patil

जरांगे-पाटील म्हणाले की, मी आंदोलन थांबवणार नाही, असे विखे- पाटील यांना फोनवरून सांगितले आहे. परंतु मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मी आज पाणी घेत आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासाठी थोडा म्हणजे अजून किती वेळ हवा आहे, हे तरी कळू दे. आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा आहे. १ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आता सोसायटीतही निवडून येणार नाहीत, असा दावा करून पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचे थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचाळ माणसांना आवर घालावा, आमच्या वाटेला गेला, तर मराठे सोडणार नाहीत, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. आमच्या आंदोलनाला कुणी तरी गालबोट लावत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

हेही वाचा

Back to top button