SRK vs Prabhas : २ तगड्या स्टार्सचा धुमाकूळ, शाहरुखचा ‘डंकी’ अन्‌ Prabhas च्या ‘सालार’ची टक्कर

shahrukh khan and prabhas
shahrukh khan and prabhas

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सालार'ची रिलीज डेट समोर आलीय. (SRK vs Prabhas) त्याचवेळी शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटदेखील येतोय. ख्रिसमसला हे दोन्ही चित्रपट आमनेसामने असतील. (SRK vs Prabhas)

तरण आदर्श यांनी दिली माहिती

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिलीय की, 'हो, हे सत्य आहे. या ख्रिसमसला दोन्ही सुपरस्टार धुमाकू‍ळ घालणार आहे. Salaar या ख्रिसमसला २२ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज होईल. याची अधिकृत घोषणा २९ सप्टेंबरला होईल.'

तरण आदर्श पुढे म्हणाले, हे दुसऱ्यांदा आहे जेव्हा HombaleFilms ची #SRK सोबत टक्कर होणार आहे. २०१८ मध्ये शाहरुख खानचा चित्रपट Zero ची टक्कर यशच्या KGF शी झाली होती. यामध्ये 'जीरो' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाली होती. तर 'केजीएफ'ने दमदार प्रदर्शन केलं होतं.'

'डंकी'मध्ये अभिनेत्री कोण?

राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी'मध्ये शाहरुख खान पहल्यांदाच हिरानी यांच्यासोबत काम करणार आहे. शाहरुखसोबत तापसी पन्नू दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news