सौरभ गांगुली म्हणतोय, विराट कोहली हा माझा सर्वात…

सौरभ गांगुली म्हणतोय, विराट कोहली हा माझा सर्वात…

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघातील वाद चव्हाट्यावर आला असून बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहली  यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. विराट कोहली याने पत्रकार परिषदेत जाहीरपणे केलेल्या काही खुलाशांमुळे बीसीसीआयवर टीका होत आहे. विराट कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडू नये यासाठी कुणाचाही फोन आला नाही, शिवाय एका संवादादरम्यान अचानक वन डे क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते, असा खुलासा केल्याने चर्चेला ऊत आला होता.

या वादानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहोत, असे सांगत पुन्हा संवादाचा पूल बांधण्याची प्रयत्न केला आहे.

भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि कर्णधारपदावरून गोंधळाचे वातावरण आहे. विराट कोहली हा क्रिकेटमधील वेगवेगळ्या लोकांसोबत सतत भांडत असतो असं एका मुलाखतीत सौरभ गांगुली म्हणाला. तसेच आपण स्वत: विराट कोहलीला फोन करुन टी-२० चं कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती, असेही गांगुली म्हणाला. मात्र विराटने आपल्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता असे त्याने सांगितले.

विराट खेळाडू म्हणून आवडतो…

विराट आणि सौरभ गांगुली यांच्यातील वादामुळे सर्वत्र चर्चा असतानाच गुडगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात सौरव गांगुलीची मुलाखत घेण्यात आली. यात कोणत्या खेळाडूची वृत्ती सर्वात जास्त आवडते असे विचारण्यात आले. यावर सौरव गांगुलीने विराटचे नाव घेतले. त्याने म्हटले की, 'आपल्याला विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो.'

दरम्यान सौरव गांगुलीने याआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मला यावर काहीच बोलायचं नाही. आम्ही हे हाताळत असून हे सर्व प्रकरण बीसीसीआयवर सोडून द्या.'

मला परावृत्त केले नाही…

बुधवारी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत दावा केला होता की, बीसीसीआयने त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडण्यापासून परावृत्त केले नाही. हा दावा बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाच्या अगदी विरुद्ध होता. विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुली यांनी सांगितले होते. विराटच्या या वक्तव्यामुळे गांगुली नाराज असल्याचं समजतंय. गांगुली यांनी गुरुवारी आणखी जोरदार विधान केल्याने याचे संकेतही मिळाले आहेत. विराटचे प्रकरण लोकांनी बीसीसीआयवर सोडावे, असे ते म्हणाले. मंडळ आपल्या पद्धतीने याला सामोरे जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माची वनडे आणि टी-20 संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. विराटला वनडेचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. यावर गांगुली म्हणाले की, बोर्डाने सप्टेंबरमध्येच त्याला सांगितले होते की, जर त्याने टी-२० कर्णधारपद सोडले तर त्याला वनडेमध्ये कायम ठेवणे कठीण होईल.

त्यामुळे तो टी-२० मध्ये कर्णधारपदी कायम राहिला. गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, विराटने तसे करण्यास नकार दिला आणि त्यानंतर बीसीसीआयकडे विराटकडून एकदिवसीय कर्णधारपद घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. गांगुलीच्या मते, वनडे आणि टी 20 मध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत.

दीड तासांपूर्वी सांगितले तुला कर्णधारपदावरून हटवले…

कोहलीने निवड समितीच्या निर्णयाबाबत बोलताना सांगितले होते, 'निवड समितीने कसोटी संघ निवडण्याच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधला. कसोटी संघ निवडीवरून चर्चा झाली. फोन कॉल संपण्याच्या काही मिनिटे आधी निवड समितीने मला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, तुला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले असून यापुढे तु संघाचे नेतृत्व करणार नाहीस. त्याच क्षणी मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य करून त्यांना ठिक आहे असं सांगितले.'

कोहलीचे नेमके उत्तर..

वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याच्या निर्णयाकडे तू कसं पाहतोस? असा सवाल केल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देताना कोहलीने नेमके उत्तर दिले. तो म्हणाला की, 'मी कारणे समजू शकतो. बीसीसीआयने तार्किक दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नाही. मी गेल्या दोन वर्षांपासून स्पष्टीकरण देत आहे आणि थकलो आहे. माझी कोणतीही कृती किंवा निर्णय संघाला खाली आणण्यासाठी असणार नाही, असे त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news