लाल किल्‍ल्‍यावर पंतप्रधानांनी मानले सुप्रीम काेर्टाचे आभार, सरन्‍यायाधीशांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाला किल्‍ल्‍यावरुन देशाला संबोधित करताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने घेतलेल्‍या निर्णयाचे कौतूक केले. यावर 
सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी  कृतज्ञता व्‍यक्‍त केली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाला किल्‍ल्‍यावरुन देशाला संबोधित करताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने घेतलेल्‍या निर्णयाचे कौतूक केले. यावर सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्‍ल्‍यावरुन देशाला संबोधित केले. त्‍यांनी प्रादेशिक भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना यासंदर्भात घेतलेल्‍या महत्त्‍वपूर्ण निर्णयासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आभार मानले. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Chandrachud ) यांनी पंतप्रधानांनी केलेल्‍या कौतुकावर कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

लाल किल्‍यावरुन देशाला संबोधिताना पंतप्रधान मोदी म्‍हणाले, "मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे आहेत. आता न्यायालयाच्या निकालांचा कार्यात्मक भाग एखाद्याच्या मातृभाषेत उपलब्ध होईल. प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढत आहे. प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्यावर आपल्या सरकारचे लक्ष केंद्रित करताना पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिला."

पंतप्रधानांनी आभार मानताच सरन्‍यायाधीशांनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता

लाल किल्‍ल्‍यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड हे प्रमुख पाहुण्‍यांमध्‍ये होते. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाने प्रादेशिक भाषेत न्‍यायालयाच्‍या निकाला उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या निर्णयाचे कौतूक केले. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पंतप्रधानांनी केलेल्‍या कौतुकावर हात जोडून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाने आपले सुमारे 1,000 निकाल प्रादेशिक भाषांमध्ये अपलोड के आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता हिंदी, ओडिया, गुजराती, तमिळ, आसामी, खासी, गारो, पंजाबी, नेपाळी आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news