Wonder Women : ‘वंडर वुमेन’चा ट्रेलर लॉन्च

wonder woman
wonder woman

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही नाती असतात, तर काही खास नाती असतात. आपण मानवांना एकाच मताची माणसे शोधण्यास अवघड जाते. ही नाती विश्‍वसनीय, वैवाहिक, रोमँटिक व आदरणीय अशा विविध प्रकारची असू शकतात. पण या सर्वांमध्‍ये एक नाते गोड, प्रेमळ व उत्‍साही असते, ते म्‍हणजे महिलांचे; महिला एकमेकांना परिचित अनुभव, भिती व आशा यामध्‍ये नेव्हिगेट करण्‍यास मदत करण्‍यासाठी एकत्र येतात. तेव्‍हा त्‍यांचा असा समाज निर्माण होतो, जो संकटात त्‍यांच्‍या पाठीशी उभा राहतो, त्‍यांना अधिक प्रबळ करतो. हा प्रवास जीवनाचा सार दाखवणारा चित्रपट 'वंडर वुमेन' सादर करत आहे. अंजली मेनन यांचे लेखन व दिग्‍दर्शन असलेला हा चित्रपट १८ नोव्‍हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट सहा गर्भवती महिलांची कथा सादर करते. ज्या गर्भधारणा व बाळंतपणाबाबत विश्वास, गोंधळ आणि प्रश्नांसह प्रसूतीपूर्व कक्षामध्‍ये येतात. या सर्व गोष्‍टींचा उलगडा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात त्यांना त्यांची ओळख आणि त्यांच्या खोलवर रुजलेल्या समस्यांची उत्तरे सापडतात.

हा चित्रपट व संकल्‍पनेबाबत सांगतात अंजली मेनन म्‍हणाल्‍या, ''मला अनुभवातून समजले आहे की भगिनी आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिकरित्या सक्षम करू शकतात. 'वंडर वुमेन'सह माझी हे प्रेमळ बंध विविध पार्श्वभूमीतील अनेक पात्रांद्वारे आणि जीवनाला सामोरे जाण्याच्या त्यांच्या मजेशीर व आनंददायी पद्धतीने सादर करण्‍याची इच्‍छा होती. ही पात्रे सामान्य महिला आहेत, जी देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. ही कथा त्यांच्या जीवनाला आणि गर्भधारणा व त्यांची नवीन मैत्री त्यांना पुढे जाण्‍यास देणाऱ्या स्‍फूर्तीला सादर करते. हा पूर्णत: हृदयस्‍पर्शी चित्रपट आहे आणि मी या पात्रांसह प्रेक्षकांचा प्रवास पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे.''

आरएसव्‍हीपी फ्लाईंग युनिकॉर्न एंटरटेन्‍मेंटसह लिटल फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शन्‍स निर्मित या चित्रपटामध्‍ये नित्‍या मेनेन, पार्वती थिरूवोथू, अमृता सुभाष, नदिया मोयडू, पद्मप्रिया जनकिरमन, सायानोरा फिलिप, अर्चना पद्मिनी प्रमुख भूमिकेत आहेत. या महिलांच्‍या कथेचे इंग्रजीमध्‍ये चित्रीकरण करण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, मल्‍याळम व कन्‍नड या भाषा देखील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news