नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून किशोर हा अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झाला होता, चीनी सैनिकांनी त्याला भारताकडे सोपवलं असल्याची माहीती केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी गुरुवारी ट्विट करुन दिली. बुधवारी केंद्रीय मंत्र्यांनी याबद्गल सांगितले होते की किशोरला माघारी सोपवण्यावरुन भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बोलणे झाले होते आणि चीनी सैन्याने किशोरला भारताकडे सोपवण्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार या तरुणाला एलएसीजवळ असलेल्या किबीथू जवळ भारताकडे सोपवलं आहे. सध्या त्याची कोरोना आणि इतर काही चाचण्या करण्यात येत आहेत. हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर भारतीय सैन्याने चीन च्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) कडे मदत मागितली होती. वास्तविक पाहता नियंत्रण रेषेच्या जवळ रहायला असलेल्या हा तरुण कथितरित्या सांगणी नदी पार करून चीनच्या भागात गेला होता.
त्यानंतर त्याला चीनी सैन्याकडून ताब्यात घेण्यात आले होते. सांगपो नदी अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश केल्यानंतर सियांग आणि असम येथे ब्रम्हपुत्रा म्हणून ओळखली जाते. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार सांगितले जात आहे की, अरुणाचल प्रदेशातून गायब झालेल्या किशोर माराम ताराँन बद्दल चीनी सैन्याला माहिती होती. सूत्र्यांच्या माहितीनुसार हा तरुण गायब झाल्याची माहिती मिळताचं भारतीय सैन्याने हॉटलाईनच्या स्थापित तंत्राद्नारे पीपल्स लिबरेशन आर्मी कडे संपर्क केला आणि त्यांना हा तरूण जडी-बुटी आणण्यासाठी गेला होता आणि रस्ती चुकला.
हेही वाचलत का?