Chinese companies: देशात १७४ नोंदणीकृत चिनी कंपन्या; ३ हजारांहून अधिक कंपन्यांमध्ये चिनी संचालक

खासदार इंद्रजीत सिंह
खासदार इंद्रजीत सिंह

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील सीमेवर तणावाचे वतावरण आहे. चिनी सैनिकांकडून सीमेवर करण्यात आलेल्या घुसखोरीमुळे देशात संतापाचे वातावरण आहे. असे असताना चीनने भारतात व्यापाराच्या माध्यमातून कशी घुसखोरी केली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. कंपनी कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री खासदार इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना ही आकडेवारी सादर केली

सरकारने दिलेल्या माहितीनूसार, देशात १७४ चिनी कंपन्या विदेशी कंपन्या म्हणून नोंदणीकृत आहेत. या कंपन्यांमध्ये ३ हजार ५६० चिनी संचालक आहेत. इन हाऊस डाटा एनालिटिक्स तसेच बिजनेस इंटेलिजेन्स यूनिट म्हणून मंत्रालयाने कॉर्पोरेट डाटा मॅनेजमेंट (सीडीएम) पोर्टल विकसित केले आहे. पंरतु, सीडएम डेटाबेसनूसार चिनी गुंतवणुकदार तसेच शेअरधारक असलेल्या कंपन्यांची संख्या सांगणे शक्य नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने कंपनी कायदा,२०१३ मधील काही नियमांमध्ये संशोधन केले असल्याचे सिंह यांनी उत्तरातून सांगितले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news