China President Xi Jinping | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार

China President Xi Jinping | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील आणि २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान त्यांचा दक्षिण आफ्रिका दौरा असेल. (China President Xi Jinping)

शी जिनपिंग यांनी मार्चमध्ये रशिया दौरा केला होता. आता २०२३ मधील त्यांचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय दौरा आहे. शी जिनपिंग यांनी यापूर्वी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. त्यांनी आफ्रिकेशी द्विपक्षीय राजनैतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच ब्रिक्स संघटनेतील देशांची पुढच्या आठवड्यात जोहान्सबर्ग येथे बैठक होणार आहे. युक्रेनमधील कथित युद्ध संबंधित गुन्ह्यांबद्दल आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी व्हिडिओद्वारे या परिषदेत सहभागी होणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील सर्व आफ्रिकन राज्यांसह एकूण ६९ देशांना ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अल्जेरिया, सौदी अरेबिया, अर्जेंटिना आणि इथिओपिया या देशांनी या गटात औपचारिक किंवा अनौपचारिकपणे सहभागी होण्यास स्वारस्य दाखवले आहे.

अमेरिकेशी संबंध ताणले असताना चीन त्याचा भू-राजकीय प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. चीनने म्हटले आहे की "'ब्रिक्स कुटुंबात' सामील होण्यासाठी आणखी समविचारी भागीदारांचे स्वागत आहे".

जगातील लोकसंख्येच्या ४० टक्क्यांहून अधिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेत ब्रिक्स देशांचा वाटा सुमारे २६ टक्के आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news