Chile Forest Fire
Chile Forest Fire

Chile Forest Fire: चिलीच्या जंगलात भीषण आग; ५१ जणांचा होरपळून मृत्यू, ११०० हून अधिक घरे जळून खाक

पुढारी ऑनलाईन डेस्क: दक्षिण अमेरिकेतील चिलीच्या जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ५१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ११०० हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने केले आहे. (Chile Forest Fire)

चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले की, सध्या चिली देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील ९२ जंगले जळत आहेत. ज्याठिकाणचे तापमान गेल्या काही आठवड्यापासून तापमान असामान्य पातळीवर वाढले त्यामुळे जंगलांना भीषण आग लागल्याचे म्हटले आहे. तसेच सर्वात प्राणघातक आग ही चिलीमधील वालपरिसो परिसरात लागली, असल्याचेही कॅरोलिना तोहा यांनी स्पष्ट केले आहे. (Chile Forest Fire)

Chile Forest Fire: हजारो हेक्टर जमीन उद्ध्वस्त

चिलीच्या गृहमंत्री तोहा म्हणाल्या की, क्विल्पु आणि व्हिला अलेमाना शहरांजवळ शुक्रवारपासून दोन आगीमुळे किमान ८ हजार हेक्टर जमीन नष्ट झाली आहे. विना डेल मारच्या किनारपट्टीवरील रिसॉर्ट शहराला शेजारच्या शहरांपेक्षा जास्त धोका आहे, ज्यांना आगीचा मोठा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या व्हिला इंडिपेंडेनियामध्ये अनेक घरे आणि व्यावसायिक केंद्रांचे नुकसान झाले आहे, असेही गृहमंत्री तोहा यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news