मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : आम्ही घरात बसून नव्हे तर रस्त्यावर उतरून काम करतोय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : आम्ही घरात बसून नव्हे तर रस्त्यावर उतरून काम करतोय
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

आमचे सरकार वर्क फ्रॉर्म रोड म्हणजेच रस्त्यावर उतरुन काम करीत आहे. त्यामुळे आम्हाला सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजतात, आम्ही धडाडीचे अन लोककल्याणाचे अनेक निर्णय घेत आहोत, तर मागील महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे वर्क फ्रॉर्म होम असा होता. त्यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न कळलेच नाही, अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

मे. दिपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, नाशिकरोड यांनी भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी (दि. 21) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना बाळासाहेब गटाचे खासदार तथा नासाकाचे चेअरमन हेमंत गोडसे व मे. दिपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे संचालक दिपक चंदे, शेरझाद होशी पटेल, सागर गोंडसे, व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार कष्टकरी जनता, वारकरी, शेतक यांचे आहे. त्यांच्या हिताचे निर्णय झपाटयाने सरकार घेत आहेत, भुविकास बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी असोत, अथवा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असोत तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे तातडीने कर्ज मंजूर प्रकरणे असोत, आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला अग्रक्रमाने प्राधान्य देत आहोत, असे म्हटले.

महाराष्ट्राने उत्तरप्रदेशला टाकले मागे….

देशातील साखर उत्पादन्नात उत्तरप्रदेश पेक्षा यंदा महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. साखर उत्पन्नात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावलौकीकात भर पडला असून यात शेतकरी वर्गाचा सिहांचा वाटा असल्याचे गौरवोदगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

जेथे कारखाना तेथे सुबत्ता…..

साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. जेथे साखर कारखाना तेथे सुबत्ता नांदत असते. सुजलाम सुफलाम वातावरण असते. साखर कारखाना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा असतो. तर सरकार कारखाना हिताचे निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news