छत्रपती संभाजीनगर : बाजार समिती निवडणूक – ग्रामपंचायत गटातून मविआचे ३ उमेदवार विजयी

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत सात जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात व्यापारी मतदारसंघातून निलेश शेठी व कन्हैयालाल जयस्वाल हे दोन उमेदवार विजयी झाले, तर हमाल तोलारी मतदारसंघातून देविदास कीर्ती शाही विजय झाले आहेत.

ग्रामपंचायत गटातून चार जागांपैकी तीन उमेदवार महाविकास आघाडीचे, तर एक भाजपचा उमेदवार विजयी झाला. यात महाविकास आघाडीचे कैलास उकिरडे, महेंद्र खोतकर, अब्दुल रहीम तर भाजपचे दत्ता उकिरडे विजयी झाले.

लाइव्ह अपडेट : 

भाजप, शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या 15 पैकी 11 जागा छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्‍या  आहेत. त्यामुळे बाजार समितीवर भाजपचा सभापती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच शेतकरी महाविकास आघाडी विकास पॅनलचे 15 पैकी चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पॅनलचे प्रमुख जगन्नाथ काळे यांचा समावेश आहे.

भाजप शिंदेगट प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे विजयी 11 उमेदवार पुढीलप्रमाणे :

राधाकिसन पठाडे, श्रीराम शेळके, अभिजीत देशमुख, भागचंद ठोंबरे, गणेश दहिहंडे, मुरली चौधरी, पूनम बामणे, भागिनाथ नवपुते, सुजाता गायके, जनाबाई ठोंबरे आणि दत्ता उकिरडे यांचा समावेश आहे.

तर शेतकरी महाविकास आघाडी विकास पॅनलचे : जगन्नाथ काळे, कैलास उकिरडे, पठाण अब्दुल रहीम सलाम आणि महेंद्र खोतकर हे चार उमेदवार निवडून आले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news