Chess World Cup 2023 : उपांत्य फेरीत दिग्गज करुआनाचा पराभव, भारताच्या आर. प्रज्ञानानंदची अंतिम फेरीत धडक

Chess World Cup 2023
Chess World Cup 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजरबैजान येथे सुरु असलेल्या चेस वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आर प्रज्ञानानंदने सोमवारी फोबियानो करुआनाचा ३.५-२.५ ने पराभव केला. या दिमाखदार विजयाने भारताच्या आर प्रज्ञानानंदने अंतिम फेरी गाठली आहे. फोबियानो करुआना या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करत फायनल गाठली आहे. (Chess World Cup 2023)

विश्वनाथ आनंद यांनीही केले कौतुक

चेस वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत आर प्रज्ञानानंदने सोमवारी फोबियानो करुआनाचा पराभव केल्यानंतर विश्वनाथ आनंद यांनीही प्रज्ञानानंदचे कौतुक केले आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये विश्वनाथ आनंद म्हणतात, प्रज्ञानानदने अंतिम फेरी गाठली! त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो कारुआनाचा पराभव केला आणि आता मॅग्नस कार्लसनचा सामना होईल. (Chess World Cup 2023)

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचेही ट्वीट (Chess World Cup 2023)

प्रज्ञानानंदने सोमवारी फोबियानो करुआनाचा पराभव केल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विजयाचा आनंद व्यक्त करताना म्हटले की, हा ऐतिहासिक विजय आहे. प्रज्ञानानंदने अंतिम फेरी गाठली त्याचे अभिनंदन..त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. चेस वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. (Chess World Cup 2023)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news