

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतचा दुसरा पती आदिल खान दुर्रानी आज तुरुंगातून बाहेर आला आहे. पाच महिने म्हैसूर तुरुंगात होता. आज मुंबईत परतल्यानंतर त्यांने राखी सावंतवर आरोप केलेले आहेत. यावेळी त्याने राखी मला मारहाण करत होती अशी माहिती दिली. (Adil Khan Allegations on Rakhi Sawant)
राखीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर, फसवणूक आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी आदिलला ताब्यात घेतले होते. त्याने आता बाहेर आल्यानंतर राखी सावंतने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बाहेर आल्यानंतर आदिलने राखी मला मारहाण करत होती असा आरोप देखील केला. या आरोपानंतर तो असेही म्हणाला की, राखीविरोधात मी आता फिर्याद देणार आहे.
राखी आणि मी 29 मे 2022 रोजी इस्लामिक विधींनुसार लग्न केले, त्यानंतर 2 जुलै 2022 रोजी अधिकृत नोंदणी झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लंडनमध्ये एका कार्यक्रमासाठी राखी गेलेली होती. या कार्यक्रमानंतर मला असे समजले की, ती अजूनही रितेशच्या संपर्कात आहे. मला याबाबत तिने काहीही सांगितले नव्हते. ती माझी फसवणूक करत आहे. त्यानंतर मी मी तिला रितेशसोबतच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा तिने माझ्यावर खोटे आरोप केले, अशी माहिती आदिलने यावेळी मीडियाला दिली.
तो पुढे म्हणाला, 'बलात्काराचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता त्यामुळे आता माझ्यावर झालेल्या खोट्या आरोपांविरोधात राखीची तक्रार दाखल करणार आहे. यापैकी एक मानहानीचा खटला असेल. कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचे काम सुरू करेल. नमाज अदा न केल्यास जीवे मारण्याची धमकी, अॅसिड फेकण्याची धमकी हे माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. मी कधीही तिच्यावर ओरडलो नाही किंवा तिच्यावर हात उचलला नाही. खरे तर राखीने मला अनेक वेळा मारहाण केली आणि माझ्याकडे तिच्याविरुद्ध पुरावे देखील असल्याची माहिती आदिलने यावेळेस दिली.