CSK vs MI : चेन्नईचा मुंबईवर ६ गडी राखून विजय

CSK vs MI : चेन्नईचा मुंबईवर ६ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एल क्लासिको म्हणून गाजावाजा झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याचा फियास्को झाला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजीपुढे मुंबईचा बोजवारा उडाला. सीएसकेने हा सामना 6 विकेटस्ने सहज जिंकला. मुंबई संघास प्रथम फलंदाजीला धाडून सीएसकेने अवघ्या 139 धावांत रोखल्यानंतर हे आव्हान 17.4 षटकांत 14 चेंडू शिल्लक ठेवून पार केले. चेन्नईच्या कॉन्वेने सर्वाधिक 44 धावा केल्या. या दोन्ही संघांतील सामने आयपीएलमधील असमजले जातात, पण यंदा चेन्नईने मुंबईविरुद्धचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी बाजी मारली.

मुंबईच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाने चौफेर फटकेबाजी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, पाचव्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. पीयूष चावलाच्या गोलंदाजीवर ऋतुराज 30 धावांवर बाद झाला. चावलाने अजिंक्य रहाणेला 21 धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा झटका दिला. रिस्टन स्टबने चेन्नईच्या अंबाती रायुडूचे आव्हान 12 धावांत संपवले, पण तोपर्यंत सीएसके विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. सलामीवीर डेवॉन कॉन्वे हा दमदार फलंदाजी करीत होता. तो अर्धशतकाजवळ पोहोचला असताना आकाश मधवाल या नवख्या गोलंदाजाने आयपीएलमधल्या आपल्या तिसर्‍याच चेंडूवर कॉन्वेला बाद केले. त्याने 44 धावा 4 चौकार लगावले. यानंतर शिवम दुबे (नाबाद 26) आणि महेंद्रसिंग धोनी (नाबाद 2) यांनी विजयी लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची चेन्नईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. पॉवर प्लेमध्ये तीन फलंदाज बाद करून चेन्नईने मुंबईला मोठा धक्का दिला. सलामीसाठी कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन मैदानात उरतले होते. परंतु, दोघेही स्वस्तात माघारी परतले. चेन्नई सुपर किंग्जचे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि तुषार देशपांडेने पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केले. तुषार देशपांडेने मुंबईच्या डावाला सुरुंग लावताना सलामीवीर फलंदाज कॅमेरून ग्रीनला 6 धावांवर क्लीन बोल्ड केले, तिसर्‍या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर इशान किशन 7 धावांवर बाद झाला. दीपक चहरच्या भेदक मार्‍यापुढे कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. परंतु, नेहल वधेराने सावध खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि दमदार अर्धशतक ठोकले. वधेराने 51 चेंडूंत 64 धावा केल्या. पथिराना आणि तुशार देशपांडेच्या भेदक मार्‍यापुढे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 8 विकेटस् गमावत 139 धावांपर्यंत मजल मारली. पथिरानाने 15 धावांत 3 विकेटस् घेतल्या.
(CSK vs MI)

तब्बल १३ वर्षांनंतर घरच्या मैदानावर चेन्नईने केली ही कामगिरी

२०१० साली धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने घरच्या मैदानावर मुंबईचा पराभव केला होता. या नंतर तब्बल १३ वर्षांनंतर चेन्नईने आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला. आत्तापर्यंत हे दोन्ही संग ३६ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी १६ चेन्नईने तर २० सामन्यात मंबईने विजय मिळवला आहे. आजच्या विजयामुळे चेन्नईच्या नावावर १२ गुण झाले आहेत.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news