पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे -सासवड-लोणंदमार्गे पंढरपूर अशी जाते.

तर संत श्री तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती-इंदापूर-अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 14 ते 18 जून या कालावधीत, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 15 जून ते 24 जून या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गात वाहतुकीत बदल

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – 14 जूनच्या रात्री 2 पासून ते 16 जूनच्या रात्री 12 पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक – कात्रज – कापूरहोळ मार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्काम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – 16 जून रात्री 2 पासून ते 17 जून रात्री 12 या कालावधीत पुणे येथून सासवड-जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणार्‍या वाहनांनी झेंडेवाडी – पारगाव मेमाणे – सुपे – मोरगाव – निरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम)- 18 जून रोजी पहाटे 2 ते सायंकाळी 5 पर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी – वाल्हे – निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणार्‍या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या मार्गाचा वापर करावा. लोणंद येथून पुढे फलटणमार्गे- 16 ते 18 जून या कालावधीत फलटण-लोणंद येथून पुणे येथे येणारी;पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक

लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- 15 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली – केसनंद – राहू – पारगाव – चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- 16 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद – राहू – पारगाव – न्हावरे- काष्टी – दौंड – कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ – दौंड – काष्टी- न्हावरे- पारगाव – राहू – केसनंद – वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- 17 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- 18 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवणमार्गे बारामतीला जाईल व बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.
बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) – 19 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवण कळस जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम)- 20 जून रोजी पहाटे 2 ते 21 जून रोजी रात्री 12 पर्यंत व 21 जून रोजी पहाटे 2 ते 22 जून रोजी रात्री 12 पर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.
निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम)

22 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस – जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवणमार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर- 23 जून रोजी पहाटे 4 ते रात्री 8 पर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुते मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरिता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- 24 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत व 25 जून रोजी पहाटे 2 ते दुपारी 12 पर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news