Chandrayaan-3 : इतिहास घडविण्‍यासाठी ISRO सज्‍ज, जाणून घ्‍या आजवरच्‍या चांद्रमाेहिमांविषयी

जगभरातील चांद्रयान मोहिमा
जगभरातील चांद्रयान मोहिमा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंतराळ संशोधनात नवीन इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे वेधले आहे.  आज (दि. २३ ऑगस्‍ट ) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान चंद्रावर अवतरणार आहे. भारताकडून चंद्रावर पोहचण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. भारताचा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे. यापूर्वीया पार्श्वभूमीवर आजवरच्‍या जगभरातील देशांनी केलेल्या चांद्रयान मोहिमांविषयी (Chandrayaan-3 Mission) जाणून घेऊया.

भारताच्या चांद्रयान मोहिमा-1, 2 आणि 3 विषयी

भारताने २००८ मध्ये पहिली चांद्रयान मोहिम राबविली होती. ती यशस्‍वी ठरली. त्यानंतर २०१९ मध्ये भारताने दुसऱ्यांदा चांद्रयान मोहिम राबवली; पण हे चांद्रयान सुरक्षित लँड न झाल्याने ही मोहिम अशस्वी ठरली. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) १४ जुलै रोजी तिसऱ्या चांद्रयान-1 मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण केले. आज सायंकाळी चांद्रयान-३ ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यास भारत अंतराळ क्षेत्रात नवीन इतिहास घडवणार आहे. या ऐतिहासिक यशामुळे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. तसेच चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरणार आहे.

Chandrayaan Mission: रशियाच्या चांद्र मोहिमा

लुना 2: रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेने 1959 मध्ये पहिली चंद्र मोहीम प्रक्षेपित केली. लुना-२ हा चंद्राच्या कक्षेत जाणारा रशियाचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. या मोहिमेद्वारेच चंद्राच्या पृष्ठभागाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. येथे कोणतेही चुंबकीय क्षेत्र नसल्याचे या मोहिमेतून स्पष्ट करण्यात आली.

लुना 3: सोव्हिएत युनियनने 1959 मध्ये चांद्रयान प्रक्षेपित केले. चंद्राची अनेक छायाचित्रे घेतलेल्या लुना 2 च्या यशानंतर, त्याच मोहिमेचा दुसरा टप्पा असलेल्या लुना-३ मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर मोठे खड्डे असल्याचे स्पष्ट केले.

लुना २५ : रशियाने नुकतेच लुना २५ ही चांद्रयान माेहिम राबवली. मात्र २० ऑगस्‍ट राेजी हे यान काेसळले. तब्‍बल ५० वर्षानंतर रशियाने राबवलेली चंद्र माेहिम अपयशी ठरली.

'नासा'च्या चांद्र मोहिमा

सर्वेअर प्रोग्राम :  अमेरिकेची अंतराळ संशाेधन संस्‍था नासाने 1966 ते 1968 दरम्यान चंद्रावर एक सर्वेअर प्रोग्राम चालवला. ज्यामध्ये सात मानवविरहित विमाने पाठवली गेली. या सर्वांनी चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट-लँड केले आणि याने चंद्राच्या मातीची यांत्रिकी आणि थर्मल वैशिष्ट्यांची माहिती गोळा केली होती.

अपोलो 8 : चंद्रावर 1968 मध्ये अपोलो-8 हे यान प्रक्षेपित केले होते. हे मिशन फ्रँक बोरमन, जेम्स लोवेल आणि विल्यम अँडर्स यांच्यासह चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले मानवयुक्त अंतराळयान होते. या मिशनने भविष्यातील मोहिमांचा पाया घातला.

अपोलो 11 : ही 1969 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली अपोलो-११ ही अमेरिकन अंतराळ मोहीम होती. ज्यामुळे मानवाची पावले प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर पडले. चंद्रावर पहिले पाऊल टाकणेरे अमेरिकन नागरिक शास्त्रज्ञ नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन हे होते.

अपोलो 13: हे 1970 मध्ये प्रक्षेपित केले गेले, परंतु हे मिशन अयशस्वी झाले. वास्तविक, चंद्राकडे जात असताना वाहनातील ऑक्सिजन टाकीत स्फोट झाला. त्यामुळो आहे अशा स्थितीतच नासाने मध्यंतरी ही मोहिम रद्द केली.

अपोलो 15 : नासाची अपोलो-15 ही मोहीम खूप खास होती. 1971 मध्ये सुरू केलेल्या या मोहिमेद्वारेच नासाने चंद्रावर आपले लुनार रोव्हर उतरवले, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाविषयी वैज्ञानिक माहिती गोळा करण्यास मदत झाली.

अपोलो 17 : नासाने 1972 मध्ये प्रक्षेपित केलेले हे मिशन अपोलो कार्यक्रमातील शेवटचे मिशन होते. चंद्रावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम होती, ज्यातून अनेक चंद्राचे नमुने गोळा करण्यात आले होते.

चीनची चांद्र मोहिम

चांगई 4: चीनने 2019 मध्ये हे चांद्र मिशन सुरू केले जे यशस्वीरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेने चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि संरचनेबद्दल बरीच माहिती चीनला दिली हाेती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news