आज सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे… भारताचे चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि त्याचवेळी खर्या अर्थाने भारत विश्वविक्रमादित्य ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ही सर्वात आव्हानात्मक मोहीम आता अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांना प्रतीक्षा आहे ती, यशस्वी, सफल लँडिंगची! चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे यशस्वी लँडिंग कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच आजची सायंकाळ विशेष उत्कंठापूर्ण असणार आहे. सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे आणि सार्या नजरा सॉफ्ट लँडिंगवर! आजची सायंकाळ विशेष रम्य ठरावी, हीच सदिच्छा..!
लँडर
लँडर विक्रम मुख्य उपकरण आहे. उपकरणात रेट्रोरिफ्लेक्टर समाविष्ट असून, त्या माध्यमातून चंद्रावरून पृथ्वीवरील रेंजिंगची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील. सिस्मोग्राफ भूगर्भीय प्रक्रिया समजून घेण्यात मदत करेल. चौथे उपकरण सरफेस थर्मोफिजिकल परीक्षण हे आहे. पटलावरील वरच्या आवरणातील रिगोलिथ तापीय परिचालकता यात मोजली जाईल.
रोव्हर
रोव्हर प्रज्ञान हे विक्रम लँडरच्या आत ठेवले गेले आहे. यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल. यात अल्फा पार्टिकल एक्साईट स्पेक्ट्रोमीटर एपीईएस व लेजर इंड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अशी दोन उपकरणे आहेत. चंद्राच्या भूभागावरील घटक शोधणे, खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती पुरवणे, हे त्याचे मुख्य कार्य असेल.
चंद्रावर पोहोचताच असा बनणार 'अशोक स्तंभ!'
लँडिंगदरम्यान चांद्रयान-3 आज दोन विक्रम प्रस्थापित करेल. यातील पहिला विक्रम हा असेल की, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया व चीननंतर भारत असा पराक्रम गाजवणारा चौथा देश ठरेल. याशिवाय, दुसरा विक्रम हा असेल, ज्यावेळी चांद्रयान-3 चंद्रावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारेल.
या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडरवरून रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवले जाणार आहे. यानंतर इस्रो कमांड देईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारले जाईल. अशारीतीने इस्रो चंद्रावर भारताची मोहर उमटवणार आहे.
हेही वाचा :