Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांच्या धमकी प्रकरणी बावनकुळे म्हणाले, ‘ट्विटर हँडलर भाजपचाच; पण…’

Chandrashekhar bawankule
Chandrashekhar bawankule
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सौरभ पिंपळकर हा भाजपचाच कार्यकर्ता आहे. मात्र सौरभने कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला. 'धमकी देणे भाजपच्या रक्तात नाही' या कालच्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथे ते माध्यमांशी ते संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी ते बोलत होते. (Chandrashekhar Bawankule)

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडीच वर्षे सरकारमध्ये असताना त्यांच्या वॉररूमधून फडणवीसांची बदनामी केली होती. त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात लिहिण्यात आले होते. व्यक्तिगत आक्षेपार्ह लेखन झाले होते अशी माहिती या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचे समर्थन कदापि शक्य नाही, त्यावर कारवाई होणारच. परंतु, मविआच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात व्यक्तिगत देवेंद्र फडणवीसांना अतिशय खालच्या पातळीवर ट्रोल करण्यात आले, या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. (Chandrashekhar Bawankule)

भाजप व महाराष्ट्राच्या नेतृत्त्वाला बदनाम केले जात आहे | Chandrashekhar Bawankule

सौरभ पिंपळकरने शरद पवार यांना धमकीच दिलेली नाही. त्याचे नाव घेऊन भांडवल केले जात आहे. तसेच भाजप व महाराष्ट्राच्या नेतृत्त्वाला बदनाम केले जात आहे. रावसाहेब दानवे आणि माझ्यासोबतची त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून संबंध जोडला जात आहे. खरेतर जी कथित धमकी देण्यात आली आहे, ती वेगळ्या फेकबुक अकाऊंटवरून दिली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

सौरभ पिंपळकर अमरावतीचा भाजपा कार्यकर्ता आहे. कोणाचा कार्यकर्ता असणे ही चूक नाही. कालपासून शरद पवारांबद्दल नरेटिव्ह सेट केल्या जात आहे. पिंपळकरने दुसऱ्याच्या अकाऊंटला फॉलो करीत रिट्विट केले. पण त्या संपूर्ण रिट्वीटमध्ये शरद पवार यांना कुठेही धमकी देणे असा उल्लेख नाही. अशा गोष्टींचे आम्ही समर्थन करीत नाही. शरद पवार यांना कोणी धमकी दिली तर महाराष्ट्र आणि फडणवीस देखील सहन करणार नाही, असही बावनकुळे म्हणाले. कल्याणचा वाद स्थानिक पातळीवर नव्हे पार्लमेंट्री बोर्ड सोडवेल,श्रीकांत शिंदे पूर्वीपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, आम्ही शक्ती देऊ, सेना भाजप नेत्यांनी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस वाढीच्या भीतीने, उद्धव ठाकरे यांच्या अति महत्वाकांक्षी धोरणामुळे फुटल्याचा दावा केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news