Chandrasekhar Bawankule : आश्चर्याचा धक्का देणारे पक्षप्रवेश होतील

Chandrasekhar Bawankule : आश्चर्याचा धक्का देणारे पक्षप्रवेश होतील
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीत आणखी काही नेते आणि कार्यकर्ते प्रवेश घेताना दिसतील. नंदुरबार जिल्ह्यात देखील आश्चर्य करायला लावणारे प्रवेश होतील. अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपात इतर पक्षातून होणाऱ्या इन्कमिंग विषयी दावा केला.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. त्याअंतर्गत आज (दि. 13) ते नंदुरबार दौऱ्यावर होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही शक्यता वर्तवली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश समिती सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी आणि भाजपाचे सर्व प्रमुख कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसचे माजी आमदार अॅड. पद्माकर वळवी हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार असल्याची शक्यता वर्तवणारी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, ज्याप्रमाणे राज्यात अचानक मुख्यमंत्री बदलून सत्तांतर घडताना दिसले त्याचप्रमाणे आश्चर्य करायला लावणारे घडेल. आणखी काही नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेताना दिसतील.

कुपोषण निर्मूलन विषयी बोलताना, विद्यमान सरकार अधिक काळजीपूर्वक उपाययोजना करीत आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा निधी अन्यत्र वळवून भलत्या मार्गी लावण्याचे प्रकार यापुढे घडणार नाहीत. येत्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करूनच निवडणुकीला सामोरे जाईल. स्थानिक स्तरावरील राजकीय मतभेद अथवा विरोध याला विचारात घेऊन शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बोलणी करण्याचे अधिकार भाजपच्या जिल्हा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नंदुरबार येथील शिंदे गटाशी युती करावी किंवा नाही हे अध्यक्ष ठरवतील. तथापि शिंदे गटाला सोबत घेऊन चालावे हेच भाजपाचे अंतिम धोरण आहे असेही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या स्वागतार्थ भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तर्फे बाईक रॅली काढून आणि आदिवासी नृत्य पथकांच्या माध्यमातून फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुथ कार्यकर्त्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी स्वतंत्र संवाद साधला. सायंकाळी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन त्यात देखील मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news