तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी द्या, मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवाशाला भेट द्यावी; मनसेची मागणी | पुढारी

तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी द्या, मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवाशाला भेट द्यावी; मनसेची मागणी

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: मराठी भाषेचे उगमस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवाशाच्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट द्यावी व नेवासा तीर्थक्षेत्र विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, असे साकडे नेवासा तालुका मनसेने घातले आहे.

मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र नेवासा नगरीला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. मराठी भाषेचे उगमस्थान ज्ञानेश्वरीची जन्मभूमी नेवासा आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक सरकार आले आणि गेले. परंतु, एकाही मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे भेट दिलेली नाही. त्यामुळे नेवासा शहराचा विकास खुंटलेला आहे.

ज्ञानेश्वरीची जन्मभूमी असल्याने तीर्थक्षेत्र नेवासा शहराच्या वैभवात भर पडावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, मनसे सहकार सेना तालुका अध्यक्ष सचिन गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजनीताई पंडूरे, महिला तालुकाध्यक्षा मीराताई गुंजाळ, शहर सचिव रवींद्र पिंपळे, महिला तालुका उपाध्यक्ष मुक्ताताई साळुंके, शहर उपाध्यक्ष नवनाथ जाधव, विभाग अध्यक्ष अमोल कपिले, बाळू कावळे यांच्या सह्या आहेत.

Back to top button