लसीकरणासाठी केेंद्राचे ‘यू विन’अ‍ॅप ; वंचित मुलांपर्यंत पोहोचणे शक्य होणार

लसीकरणासाठी केेंद्राचे ‘यू विन’अ‍ॅप ; वंचित मुलांपर्यंत पोहोचणे शक्य होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनातर्फे गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी 'यू विन' अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून अ‍ॅप्लिकेशनच्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होणार आहे. यामध्ये प्रत्येक गर्भवती महिला आणि मुलांच्या नावाप्रमाणे लसीकरणाचे रेकॉर्ड ठेवता येणार आहे. लसीकरणापासून वंचित मुलांपर्यंत पोहोचणेही शक्य होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

कोरोना लसीची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाने 'कोविन अ‍ॅप' विकसित केले होते. त्याचप्रमाणे, गर्भवती महिला आणि बालकांच्या लसीकरणासाठी 'यू विन' अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थ्यांना 'ई कार्ड' दिले जाणार आहे. त्यातून आतापर्यंत देण्यात आलेल्या लसी, उर्वरित लसी, वंचित मुले याबाबत माहिती दिसू शकेल.

पुढील महिन्यापासून वापरता येणार
शासनाच्या 'यू विन' अ‍ॅप्लिकेशनमुळे लसीकरणासाठी ऑनलाइन अपॉइनमेंट घेता येणार आहे. आपल्या जवळचे केंद्र, उपलब्ध लसी अशी सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध असेल. प्रत्येक लाभार्थ्याच्या ई-कार्डला मोबाइल नंबर, आधार कार्ड जोडलेले असणार आहे. माता आणि शून्य ते सात वयोगटातील बालकांचे लसीकरणाचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड ठेवणारे 'यू विन' हे ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. महापालिकेला सूचना आल्यावर त्यानुसार डेटा ठेवला जाईल, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हे ही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news