सुब्रह्मण्यम स्वामी यांना पुरेशी सुरक्षा, केंद्राची हायकोर्टात माहिती

सुब्रह्मण्यम स्वामी यांना पुरेशी सुरक्षा, केंद्राची हायकोर्टात माहिती
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली. स्वामी यांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या खासगी निवासस्थानी देखील आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.

वारंवार आश्वासन देऊन देखील केंद्र सरकारने आपल्याला खासगी निवासस्थानी पुरेशी सुरक्षा दिलेली नाही, असा दावा स्वामी यांनी एका याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात केला होता. सुनावणीवेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी स्वामी यांच्या सुरक्षेसाठी योजल्या जात असलेल्या उपायांची माहिती न्यायालयाला दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news