महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, PM मोदींची मोठी घोषणा! | पुढारी

महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, PM मोदींची मोठी घोषणा!

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यात दिली. मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी मेळाव्यात तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आले.

महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरू आहे. तर काही प्रकल्प लवकरच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून 8 कोटी महिलांचे सक्षमीकरण

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात 8 कोटी महिलां सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत. यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहेत, असे देखिल ते म्हणाले.

याशिवाय स्टार्ट अप, लघु उद्योगांना पाळबळ देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहेत. त्यामुळे तरुणांना आपलं कौशल्या दाखवण्याची संधी मिळेल. तसेच सरकारच्या प्रयत्नांमधून दलित, आदिवासी, महिलांना समान संधी उपलब्ध होत आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :

Wonder Women : ‘वंडर वुमेन’चा ट्रेलर लॉन्च

Scam : ‘३६०’ रुपयांची बिअर पडली ‘४४,७८२’ रुपयांना, वकिलाची व्हॉट्स ॲपवरून फसवणूक!

Back to top button